महाराष्ट्र

maharashtra

जाणून घ्या, कोण होणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री, 'ही' तीन नावे चर्चेत

By

Published : Sep 18, 2021, 4:59 PM IST

Updated : Sep 18, 2021, 5:23 PM IST

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत. यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग
कॅप्टन अमरिंदर सिंग

पंजाब - पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत. यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले होते. याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्यांची निवड करण्याचे आदेशही हायकमांडकडून देण्यात आले आहेत. आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा -पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

  • कोण होणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री?

आज पंजाबमधील राजकारणाला नवे वळण आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावांची यादी तयार केली आहे. यात पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव पहिले आहे. तर पंजाबमधील मंत्री सुखजिंदर रंधावा यांचा दुसरा नंबर आहे. तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री राजेंदर कौर भट्ठल यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

  • मुख्यमंत्रीपदासाठी हे तीन नावे चर्चेत -

1) सुनील जाखड - कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होत असताना त्यांना सुनील जाखड यांनी विरोध केला नाही. तसेच पंजाबमधील हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जाखड यांच्या चेहऱ्याचा उपयोग होईल. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने सुनील जाखड यांच्या नावाला पसंती दिली असल्याची चर्चा आहे.

2) सुखजिंदर रंधावा - हे सध्या पंजाब काँग्रेसमध्ये मंत्री आहेत. रंधावा हे अकाली दलांवर प्रहार करत असतात. त्यामुळे त्यांची ही स्टाईल पकडून काँग्रेस हायकमांड त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवू शकते अशी चर्चा सुरू आहे.

3) राजेंदर कौर भट्ठल - पंजाबचे माजी मुख्यमंत्री म्हणून राजेंदर कौर भट्ठल यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवामुळे काँग्रेस हायकमांड भट्ठल यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Last Updated :Sep 18, 2021, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details