महाराष्ट्र

maharashtra

गणपती उत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या 150 फेऱ्या होणार

By

Published : Aug 5, 2021, 10:28 PM IST

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्याकरिता भारतीय रेल्वेकडून आता गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण १५० फेऱ्या होणार आहेत, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले.

150 Railway Tour Konkan
गणपती उत्सव रेल्वे फेऱ्या कोकण

नवी दिल्ली -गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्याकरिता भारतीय रेल्वेकडून आता गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण १५० फेऱ्या होणार आहेत, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

हेही वाचा -मुंबईहून उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेले तीन जण नदीत वाहून गेले; बुडणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील आमदाराच्या मुलीचा समावेश!

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून १५० फेऱ्या होणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केलेल्या 72 फेऱ्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सद्यापरिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता 38 फेऱ्या जाहीर केल्या असून, अशा एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवासाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाताना अडचण आम्ही येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे मंत्री दानवे यांनी सांगितले.

या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. कुठल्याही प्रवाशांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.

हेही वाचा -संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

ABOUT THE AUTHOR

...view details