महाराष्ट्र

maharashtra

Afghanistan Child Trafficking: तालिबान राजवटीत संकट! पोट भरण्यासाठी मुलं मृत्यूशी खेळायेत

By

Published : Jun 8, 2022, 5:47 PM IST

तालिबान राजवटीत अफगाणिस्तान उपासमारीला सामोरे जात आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात लहान मुलांची तस्करी होत असताना, 8-10 वर्षांच्या मुलांना उपासमारीने जीवाशी खेळावे लागत आहे.

Afghanistan Child Trafficking
Afghanistan Child Trafficking

नवी दिल्ली -अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाल्यापासून, जिथे महिलांवरील निर्बंध वाढले आहेत, त्या देशातील मुलांची स्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात लहान मुलांची तस्करी होत असताना, 8-10 वर्षांच्या मुलांना उपासमारीने जीवाशी खेळावे लागत आहे. सीमा ओलांडणाऱ्या मोठमोठ्या ट्रकच्या मागे ही मुले धावताना दिसतात.


अफगाणिस्तानच्या तोरखाम सीमेवर मुले ट्रकला जोडलेल्या दोरीने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. मानवी तस्कर 4-5 वर्षांच्या मुलांना मोठ्या ट्रकच्या चाकांना बांधतात. फ्रंटियर पोस्टने कस्टम एजंटच्या हवाल्याने सांगितले की, या क्रूरतेमुळे अनेक मुले ट्रकमधून पडून मृत्यूमुखी पडत आहेत. आलम म्हणजे 10 वर्षांपर्यंत लहान मुले सिगारेट, बॅटरी, खाद्यपदार्थ आणि स्थानिक पेये घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये लटकतात. या वस्तूंची विक्रीही पाकिस्तानच्या परिसरात बिनदिक्कतपणे केली जाते. आपला माल विकून हे भोळे लोक त्या बदल्यात मैदा, डाळ, साखर घेऊन घरी परततात. तोरखाम सीमेवरील पाकिस्तानच्या स्थानिक दुकानदाराने सांगितले की स्थानिक लोक कर न भरता स्वस्त वस्तू खरेदी करून या मुलांचा फायदा घेतात.

द फ्रंटियर पोस्टच्या वृत्तानुसार, काही मुलांच्या पिशव्यांमध्ये बेकायदेशीर ड्रग्स आणि अंमली पदार्थ असतात जे ते पाकिस्तानमध्ये स्वस्तात विकण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणात ते सुरक्षा अधिकार्‍यांच्या हातीही अडकतात. अलीकडेच तोरखाम बॉर्डरवर तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुलांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला.

तपासादरम्यान त्या ट्रकच्या टायरजवळ ४ ते ५ वयोगटातील मुले सापडली, जी परत अफगाणिस्तानात पाठवण्यात आली. यामध्ये तालिबानी सैनिक अनेकदा मुलांचा पाठलाग करतात. जेणेकरून ते सीमा ओलांडू शकत नाहीत. परंतु, भूक आणि गरज यांनी त्या निष्पाप मुलांची सर्व भीती काढून टाकली आहे. दोन्ही देशांमधील मासिक आणि साप्ताहिक बैठकींमध्ये मुलांच्या तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, त्या आधारावर दक्षता वाढवण्यात आली आहे, असे कस्टम अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्येतालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानातील मानवी हक्कांची स्थिती बिकट झाली आहे. देशातील लढाई संपली असली तरी महिला आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध मानवी हक्कांचे उल्लंघन सुरूच आहे. तालिबानने त्यांचा शिक्षणाचा आणि कामाचा हक्क हिरावून घेतला आहे. महिला आणि मुलींवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या काही आठवड्यांत अफगाणिस्तानात अल्पसंख्याकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. मालिका बॉम्बस्फोटात अनेक अल्पसंख्याकांना जीव गमवावा लागला.

हेही वाचा -MSP 'Approved: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! खरीप पिकांच्या MSP'ला दिली मंजूरी

ABOUT THE AUTHOR

...view details