महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Border : सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिल्लीला घेऊन जावे, डीके शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By

Published : Dec 29, 2022, 9:35 AM IST

काँग्रेसच्या कर्नाटकचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Chief Minister Basavaraj Bommai ) यांना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमाप्रश्नावर ( Maharashtra Border Dispute ) सर्वपक्षीय शिष्टमंडळासह तातडीने दिल्लीला जावे. ( Take All Party Delegation To Delhi On Border Row ) यासोबतच बोम्मई यांनी याप्रकरणी केवळ पोकळ विधाने केल्याचा आरोपही त्यांनी केला. ( DK Shivakumar Tweet about CM statement )

DK Shivakumar Tweet
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार

बंगळुरू : ( Maharashtra Border Dispute ) कर्नाटकातील आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे बोम्मई ( Chief Minister Basavaraj Bommai ) म्हणाले होते. या विधानावर शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांना या प्रकरणी जाहीर आश्वासन देण्याची मागणी केली. डीके शिवकुमार यांनी ट्विट ( DK Shivakumar Tweet ) करत लिहले आहे की, मुख्यमंत्री केवळ पोकळ विधाने करत आहेत यात आश्चर्य वाटत नाही. कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे त्यांना खरेच वाटत असेल, तर त्यांनी तातडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळासह दिल्लीला जावे ( Take All Party Delegation To Delhi On Border Row ) आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत जाहीर आश्वासन द्यावे, अशी मागणी करावी. ( DK Shivakumar Tweet about CM statement )

कायदेशीर पावले उचलण्याचा ठराव :सीमाप्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झालेला ठराव बेजबाबदार आणि संघराज्य रचनेच्या विरोधात असल्याचे सांगून बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले होते की, राज्याची एक इंचही जमीन सोडली जाणार ( Maharashtra Karnataka border dispute ) नाही. कर्नाटकातील 865 मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंगळवारी मंजूर केला होता.

सीमाप्रश्न पुन्हा चिघळला : गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्न पुन्हा चिघळला ( Border issue flared up again ) असून दोन्ही राज्यांचे नेते यावर सातत्याने वक्तव्ये करत आहेत. बेळगावमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी अनेक कन्नड आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन राज्यांमधील हा सीमावाद 1957 मध्ये भाषेच्या आधारावर त्यांच्या पुनर्रचनेपासूनचा आहे. पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या बेळगाव आपला असल्याचा महाराष्ट्राचा दावा आहे, कारण तेथे मराठी भाषिकांची मोठी लोकसंख्या आहे. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या 865 मराठी भाषिक गावावरही महाराष्ट्र आपला हक्क सांगत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details