महाराष्ट्र

maharashtra

NIA Raids In Karnataka : कर्नाटकात पकडलेला संशयित दहशतवादी निघाला 'या' काँग्रेस नेत्याचा मुलगा

By

Published : Jan 7, 2023, 3:19 PM IST

गुरुवारी कर्नाटकात एनआयएच्या छाप्यांमध्ये (NIA Raids In Karnataka) पकडलेल्या सहा जणांपैकी एक असलेल्या रेशानचे काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल होत आहेत. (terrorist caught in Karnataka). अटक करण्यात आलेला रेशान हा ब्लॉक काँग्रेसचे सरचिटणीस ताजुद्दीन यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. (son of congress leader terrorist).

NIA
एनआयए

उडुपी (कर्नाटक) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या दहशतवादी संशयितांपैकी एक काँग्रेस नेत्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. (son of congress leader terrorist). ब्लॉक काँग्रेस सरचिटणीस यांचा मुलगा रेशान याला एनआयएने ५ जानेवारीला अटक केली आहे. (terrorist caught in Karnataka). या अटकेमुळे आता कर्नाटकात राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. एनआयएने गुरुवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये अटक केलेल्या सहा जणांपैकी रेशान हा एक होता. (NIA Raids In Karnataka). राज्यातील ISIS नेटवर्कशी संबंधित एका प्रकरणाच्या अनुषंगाने हे छापे टाकण्यात आले होते. एनआयए राज्यातील दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणांचा तपास करत आहे. ते राज्यात दहशतवादाला खतपाणी घालण्यात गुंतलेल्या नेटवर्कच्या मुळाशी जाण्यासाठी तपास करत आहे.

चौकशी तीव्र करण्याची मागणी : उडुपीचे भाजप आमदार रघुपती भट यांनी सांगितले की, एनआयएने अटक केलेल्या संशयितांपैकी रेशान हा उडुपी जिल्ह्याच्या ब्रह्मावर ब्लॉक काँग्रेसचे सरचिटणीस ताजुद्दीनचा मुलगा आहे. ते म्हणाले, 'त्याला आधीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. मी सरकार आणि एनआयएकडे चौकशी तीव्र करण्याची मागणी करतो आहे. विशेषत: किनारपट्टीच्या प्रदेशात, जिथे अशा अनेक व्यक्ती विघटनकारी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय आहे.'

ताजुद्दीन हे सामान्य कार्यकर्ते नाहीत :भट पुढे म्हणाले, 'मला काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारायचा आहे. ताजुद्दीन हे काही सामान्य कार्यकर्ते नाहीत. ते ब्लॉक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाच्या कार्यात अग्रेसर असतात. ते विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्या अगदी जवळचे आहेत. उल्लाल काँग्रेसचे आमदार यू.टी. खादर यांच्या अगदी जवळचे आहेत.' ते म्हणाले, 'जेव्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा दहशतवादी प्रकरणात पकडला जातो तेव्हा काँग्रेस पक्षाने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.'

सचिवपदावरून हकालपट्टी होणार का? :आमदार रघुपती भट्ट पुढे म्हणाले, 'काँग्रेस नेत्यांसोबतचा फोटो मी प्रसिद्ध केला आहे. रेशानच्या कुटुंबीयांचीही चौकशी झाली पाहिजे. रिशनची आई सरकारी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. तिच्याविरोधातील शिक्षणमंत्री नागेश यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. कॉलेजविरोधातील वक्तव्यांचे ऑडिओ मंत्र्यांना देण्यात आले आहेत.'

दोन दिवसांपूर्वी अटक : राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी शिवमोग्गा ISIS कट प्रकरणात सहा ठिकाणी शोध टाकत दोघांना अटक केली होती. एनआयएने हे छापे कर्नाटकातील दक्षिण कन्नड, शिवमोग्गा, दावणगेरे आणि बेंगळुरू या जिल्ह्यांमध्ये टाकले होते. हे प्रकरण आरोपींनी इस्लामिक स्टेट (IS) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना पुढे नेण्यासाठी आणि देशाची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्यासाठी रचलेल्या कटाशी संबंधित आहे. रेशान थाजुद्दीन शेख आणि हुजैर फरहान बेग अशी अटक करण्यात आलेल्या ISIS अतिरेक्यांची नावे आहेत. या प्रकरणात इतर दोन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details