महाराष्ट्र

maharashtra

TET Hall Ticket : सनी लिओनीचे टीईटी परीक्षेचे आले हॉल तिकिट, शिक्षण अधिकाऱ्यांना फुटला घाम

By

Published : Nov 9, 2022, 10:08 AM IST

कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेत एक ( Karnataka TET Exam ) अतिशय विचित्र प्रकरण समोर आला आहे. परीक्षेसाठी गेलेल्या एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे छायाचित्र छापण्यात ( Sunny Leones Pic On Hall Ticket ) आले होते. आता या प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sunny Leones
सनी लिओनी

कर्नाटक : कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेत ( Karnataka TET Exam ) एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आला आहे. परीक्षेसाठी गेलेल्या एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे छायाचित्र छापण्यात ( Sunny Leones Pic On Hall Ticket ) आले होते. आता या प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

ट्विटरवर संबधित प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट शेअर : कर्नाटक काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष बीआर नायडू यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर संबधित प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने हॉल तिकिटावर उमेदवाराच्या फोटोऐवजी सनी लिओनीचे चित्र छापल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू यांनी कन्नडमध्ये ट्विट करून लिहिले, शिक्षक भरतीच्या हॉल तिकिटात उमेदवाराच्या फोटोऐवजी, शिक्षण विभागाने ब्लू फिल्म अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापला होता.

पतीच्या मित्राने भरला होता फॉर्म :या घटनेची माहिती असलेल्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उमेदवाराने आपला अर्ज, कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड करण्यासाठी इतर कोणाची तरी मदत घेतली होती. शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराचा फॉर्म तिच्या पतीच्या मित्राने भरला होता. उमेदवार चिकमंगळूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिवमोग्गा येथील शिक्षक पदासाठी त्यांनी अर्ज केला होता. परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कर्नाटकातील 781 केंद्रांवर झालेल्या परीक्षेला एकूण 3,32,913 उमेदवारांनी हजेरी लावली होती. सार्वजनिक सूचना विभागाने या घटनेवर स्पष्टीकरण जारी करून म्हटले आहे की, चूक ना सरकारची होती ना शिक्षण विभागाची, मात्र, कर्नाटक शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एफआयआर नोंदवणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details