महाराष्ट्र

maharashtra

Sonia Gandhi On Plenary Session : सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत; मोदी सरकारवर रायपुरात केली टीका

By

Published : Feb 25, 2023, 6:56 PM IST

नवा रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

Sonia Gandhi On Plenary Session
Sonia Gandhi On Plenary Session

रायपूर :नवा रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. मात्र, सोनिया गांधींनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

अध्यक्ष म्हणून भारत जोडो यात्रेने सांगता : सोनिया गांधी म्हणाल्या की काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची भारत जोडो यात्रेने सांगता झाल्याचा आनंद आहे. सोनिया गांधी यापुढे काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भारत जोडो यात्रेसोबतच त्यांनी काँग्रेसच्या राजकारणापासून स्वत: संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. सोनिया गांधींच्या या विधानाचा संबंध त्यांच्या निवृत्तीशी आहे.

सोनिया गांधींचा भाजपवर हल्ला : सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर द्वेषाची आग भडकवत अल्पसंख्याक, महिला, दलित आदिवासींना लक्ष्य केल्याचा आरोप केला. सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सध्याच्या राजवटीला कठोरपणे सामोरे जाण्यास सांगितले आहे. या अधिवेशनाला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक साम्राज्याशी संबंधित वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकार ठराविक उद्योगपतीचे पक्ष घेऊन अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्याची देशाप्रती विशेष जबाबदारी : प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची पक्ष, देशाप्रती एक विशेष जबाबदारी आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की काँग्रेस पक्ष संपूर्ण जाती धर्मांच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. येथे वर्णापरुन लिंगावरुन नागरिकांसोबत भेदभाव केला जात येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकत्यांनी देशासाठी प्रत्येक क्षण समर्पित करायाला हवा असे मत त्यांनी मांडले.

भाजपचे द्वेषाचे राजकारण : सोनिया गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, काँग्रेस, देशासाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपने प्रत्येक संस्था काबीज केली आहे. भाजप द्वेषाच्या आगीला खतपाणी घालत आहे. हिंसाचाराला खतपाणी घालत आहे, तसेच अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना भाजप लक्ष्य करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

2024 मध्ये सरकार स्थापन करण्याचे अवाहन : 2024 मध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्याचे आवाहन करताना, काँग्रेसच्या माजी प्रमुख सोनिया गांधी यांनी आरोप केला की भाजप सरकारची कृती घटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांचा अवमान करीत आहे. आजची परिस्थिती मला त्यावेळची आठवण करून देते जेव्हा मी पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा संदेश स्पष्टपणे पोहोचवला पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या.

हेही वाचा -Google lays off robots : अल्फाबेट टाळेबंदीमुळे ट्रॅश-सॉर्टिंग रोबोट्सवर परिणाम; 100 रोबोट कामगारांना कामावरून काढले

ABOUT THE AUTHOR

...view details