महाराष्ट्र

maharashtra

Actor Salman Khan 75व्या स्वातंत्र्यदिनी सलमान खानने चाहत्यांना दिली मोठी भेट या तारखेला टायगर 3 होणार रिलीज

By

Published : Aug 15, 2022, 1:35 PM IST

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सलमान खानने चाहत्यांना एक मोठी भेट Salman Khan big gift to fans दिली आहे. सलमान खानने बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर केली Tiger 3 release date announced आहे. जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार.

Salman Khan
सलमान खान

हैदराबादएकीकडे 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देश आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या जल्लोषात सलमान खानने चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. सलमान खानने त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 The much awaited movie Tiger 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. होय, या चित्रपटासाठी चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. चाहत्यांना गिफ्ट देण्यासाठी सलमानने हा खास दिवस निवडला आहे. एक था टायगर चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदही सलमान साजरा करत आहे.

सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एक था टायगर या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण Ek Tha Tiger completes 10 years झाल्यानिमित्त हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांच्या क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. यानंतर टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली Tiger 3 release date announced आहे. टायगर 3 हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अनेक वर्षांपासून चाहते वाट पाहत होते.

या चित्रपटाचे शूटिंग लॉकडाऊन दरम्यान थांबवण्यात आले आणि नंतर ते पुढे चालू ठेवण्यात आले. त्याचबरोबर या चित्रपटाचा एक टीझरही चाहत्यांसाठी शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि सलमान खानची झलक पाहायला मिळाली आहे.

सलमान खानच्या Actor Salman Khan ताज्या अपडेटबद्दल सांगायचे तर, तो त्याच्या पुढच्या भाईजान या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लडाखला रवाना झाला आहे. ज्याचे नाव कभी ईद कभी दिवाळी आहे. सलमान खान 15 ऑगस्ट 2022 रोजी कलिना विमानतळावर दिसला होता.

हेही वाचाActor Armaan Kohli अभिनेता आरमान कोहलीची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी धाव

ABOUT THE AUTHOR

...view details