महाराष्ट्र

maharashtra

Lal Bihari Mratak : 'मृतक' लाल बिहारीनं सरकारकडं मागितला AK-47 चा परवाना; म्हणाले जिवंत मृतकांच्या सुरक्षेसाठी परवाना आवश्यक

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 9:57 AM IST

Lal Bihari Mratak : जिवंत असून मृत जाहीर होणाऱ्या नागरिकांसाठी लढणारी उत्तर प्रदेशची 'मृतक' संघटना चर्चेत आली आहे. आझमगडचे रहिवासी आणि मृतक संघटनेचे अध्यक्ष लाल बिहारी यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून एके-४७ चा परवाना मागितला आहे.

Lal Bihari Mratak
Lal Bihari Mratak

मृतक संघटनेचे अध्यक्ष लाल बिहारी

आझमगड Lal Bihari Mratak : तुम्हाला अभिनेता पंकज त्रिपाठीचा 'कागज' हा चित्रपट आठवत असेल, यात मुख्य पात्र स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारतो. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील आझमगड येथील मृत लाल बिहारी यांच्यावर आधारित होती. याच लालबिहारींनीही मृतक संघटना स्थापन केलीय. लाल बिहारी यांनी आता सरकारकडं AK-47 रायफलचा परवाना मागितलाय. यासंदर्भात त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवलंय. यात त्यांनी लिहिलंय की, जिवंत मृतकांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. भ्रष्टाचार आणि फसवणुकीविरुद्धच्या लढ्यामुळं या जिवंत मृतकांच्या संरक्षणासाठी हा परवाना आवश्यक आहे.

18 वर्षांच्या संघर्षानंतर जिवंत होते लाल बिहारी : मूळचे मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील अमिलोचे रहिवासी, मृतक संघटनेचे लाल बिहारी यांचा जन्म 6 मे 1955 रोजी निजामाबाद तहसीलच्या खलीलाबाद गावात झाला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, गावप्रमुख आणि तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर त्याच्या अल्पवयीन चुलत भावांची नावं नोंदवली. 18 वर्षे लालबिहारींनी सरकारी रेकॉर्डमध्ये स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर 30 जून 1994 रोजी मुख्य महसूल अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी आझमगड यांनी लाल बिहारी यांना सरकारी रेकॉर्डमध्ये जिवंत घोषित केलं.

लालबिहारींनी निवडणूकही लढवली : लालबिहारींनी स्वतःला जिवंत घोषित करण्यासाठी अनेक डावपेचांचा अवलंब केला. यासाठी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही लढवली. निवडणूक लढवण्यासोबतच लाल बिहारी यांनी मृतक संघटनादेखील स्थापन केली. ज्याच्या बॅनरखाली त्यांनी जिवंत मृतकांसाठी लढण्यास सुरुवात केली. शेकडो जिवंत मृतकांना पुन्हा कागदावर जिवंत केलं. निवडणूक लढवताना लालबिहारींची कीर्ती देशातच नव्हे तर जगात पसरली. त्यांच्या निवडणुका कव्हर करण्यासाठी थेट अमेरिकेतून एक टीम आली होती.

लाल बिहारींवर बनला 'कागज' चित्रपट : लाल बिहारींच्या जीवनावर 'कागज' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे. सध्या दुसऱ्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. लालबिहारी सरकारी रेकॉर्डमध्ये मृत घोषित झाल्याबद्दल प्रशासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार धरतात. यामुळं त्यांनी सरकारकडून 25 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावाही केला होता. मात्र, त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला.

लाल बिहारींनी मुख्य सचिवांना लिहिलं पत्र : मृतक संघटेनेचे लाल बिहारी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून स्वतःच्या आणि इतर जिवंत मृतकांच्या जीवाच्या रक्षणासाठी AK-47 रायफलचा परवाना देण्याची मागणी केलीय. ईटीव्ही भारतशी बोलताना लाल बिहारी म्हणाले की, त्यांनी स्वत:साठी तसंच कागदपत्रांमधील सर्व मृतक लोकांसाठी AK-47 ची मागणी केलीय. कारण, जिवंत लोकांसाठी परवाना असलेली शस्त्रे आहेत. त्यामुळं सरकारने मृतकांना किमान AK-47 द्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या जीविताचं व मालमत्तेचं संरक्षण करता येईल. शासनाच्या व्यवस्थेवर ते नाराज आहेत. अधिकारी व कर्मचारी मिळून जनतेची पिळवणूक करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. UP Crime News : भुतांचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच निघाला दरोडेखोर, गुजराती व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी; 7 पोलीस कर्मचारी निलंबित
  2. UP Budget 2023 : योगी सरकारचा आज अर्थसंकल्प, अनेक लोकप्रिय घोषणांची शक्यता, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details