महाराष्ट्र

maharashtra

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

By

Published : Dec 30, 2022, 6:57 AM IST

विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. याबरबरच आजच्या महत्वाच्या घडामोडींमध्ये कस्टम झोन तीनकडून आज जवळपास 538 कोटींचे 140 किलो ड्रग्ज नष्ट केले जाणार ( Drugs will be destroyed ) आहे. तसेच अभिनेत्री तुनिषा शर्माच्या ( Actress Tunisha Sharma mother ) आईची पत्रकार परिषद होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. ( Top News Today In Marathi )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई :अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. ( Today last day of the legislative session ) आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.

  • नवी मुंबईत 538 कोटींचे 140 किलो ड्रग्ज नष्ट केले जाणार :कस्टम झोन तीनकडून आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज नष्ट केले जाणार आहे. तळोजा येथे दुपारी 12 वाजता हे ड्रग्ज नष्ट केले जाणार आहे.
  • तुनिषा शर्माच्या आईची पत्रकार परिषद :अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईची ( Actress Tunisha Sharma Mother )पत्रकार परिषद होणार आहे. याबरोबरच आज वसई कोर्टात शिजान खान याला वालीव पोलीस हजर करणार आहेत.
  • राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धांचे उद्घाटन :अहमदनगरच्या माऊली सभागृहात कांकरिया करंडक राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. सलग 25 वर्ष राज्यात सुरू असणारी बाल एकांकिका स्पर्धा म्हणून या स्पर्धेला महत्व आहे. राज्यभरातील 25 एकांकीका या स्पर्धेत सादर होणार आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील मायरा वयकुल ही उद्घाटनासाठी असणार आहे.
  • राणा कपूर यांच्या जामीनावर सुनावणी :येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात जामिनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
  • रितेश देशमुख आणि जेनेलिया तुळजापुरात दर्शन घेणार :अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया वेड चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार आहेत. ( Actor Riteish Deshmukh and Genelia Wade movie )

ABOUT THE AUTHOR

...view details