महाराष्ट्र

maharashtra

Top News Today : वाचा एका क्लिकवर ; आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी

By

Published : Oct 29, 2022, 7:23 AM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
दिवसभरातील ठळक घडामोडी

मुंबई :आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. छठ पूजेचा दुसरा दिवस - खरना, आज यूएनएससी दहशतवाद विरोधी दिल्लीत बैठक, किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी, मुख्यमंत्र्यांचा नंदूरबार दौरा, उस्मानाबाद बंदचे आवाहन, पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा, आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, आमदार बच्चू कडूंचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा या विशेष घडामोडी (Marathi News) आहेत.

आज छठ पूजेचा दुसरा दिवस - खरना (Chhath Puja 2022) : आज पूजेचा दुसरा दिवस आहे. छठच्या दुसऱ्या दिवसाला खरना म्हणतात. या दिवशी महिला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. संध्याकाळी, सूर्यास्तानंतर लगेचच, उपवास मोडला जातो. त्यानंतर अन्न तयार केले जाते. त्यानंतर सूर्याला नैवैद्य अर्पण केला जातो. व्रताचा तिसरा दिवस दुसऱ्या दिवसाच्या नैवेद्यानंतर लगेच सुरू होतो.


आज मुख्यमंत्र्यांचा नंदूरबार दौरा (CM Nandurbar Visit Today) : मुख्यमंत्री आज नंदूरबारच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे पार पडणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.

आज यूएनएससी दहशतवाद विरोधी दिल्लीत बैठक(UNSC Anti Terrorism meeting ) : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत दहशतवाद्यांकडून होत असलेल्या इंटरनेटचा वापर, नवीन पेमेंट सिस्टीम आणि ड्रोनचा सामना करण्याच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे.

आज किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी (SRA scam Kishori Pednekar) : कथित एसआरए घोटाळा प्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना आज सकाळी 11 वाजता दर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच आज सकाळी 10.30 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे



आज उस्मानाबाद बंदचे आवाहन (MLA Kailas Patil hunger strike) : काल आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस संपला. परंतु अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले.


आमदार बच्चू कडूंचा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा (MLA Bachu Kadu Yavatmal district visit) : आज आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. ते आज नुकसानीची पाहणी करणार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.



आज पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा (Public meeting of Shiv Sena in Paithan) : आज शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची उपस्थिती असणार आहेत.



आशिष शेलार यांची पत्रकार परिषद (Ashish Shelar press conference) : आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details