महाराष्ट्र

maharashtra

Rahul Bhat killing: काश्मीर खोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी काश्मिरी पंडितांची निदर्शने.. राहुल भटच्या हत्येचा निषेध

By

Published : May 13, 2022, 12:10 PM IST

Updated : May 13, 2022, 12:19 PM IST

Kashmiri Pandits Protest
काश्मिरी पंडितांची निदर्शने ()

काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या कुटुंबीयांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी निदर्शने केली ( Kashmiri Pandits protest ) आहेत. बडगाममधील सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येमुळे ( Rahul Bhat killing ) खोऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली: राहुल भट यांना ( Rahul Bhat killing ) न्याय मिळावा आणि काश्मीर खोर्‍यातील अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षा पुरवण्याची मागणी करत काश्मिरी पंडितांनी शुक्रवारी आंदोलन सुरूच ( Kashmiri Pandits protest ) ठेवले. मागण्या पूर्ण न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बडगामच्या शेखपोरा येथील पंडित कॉलनीत, या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी काश्मिरी पंडितांच्या आंदोलकांनी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे मोर्चा वळवला.

"आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची वाट पाहत होतो पण ते आले नाहीत. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि आम्ही राहुल भटच्या हत्येविरोधात विमानतळाकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला," असे मोर्चा दरम्यान एका आंदोलकाने सांगितले. "आम्ही प्रशासन आणि पोलिसांना कळवले होते की उपराज्यपाल यांनी घटनास्थळी भेट द्यावी आणि आम्हाला आमच्या सुरक्षिततेबद्दल आणि न्यायाचे आश्वासन द्यावे, परंतु त्यांनी आम्हाला भेट दिली नाही."

पोलिसांनी मात्र अल्पसंख्याक समाजाचा निषेध मोर्चा हाणून पाडला :एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आंदोलकांमधील काही लोकांनी दगडफेक केल्याने आम्हाला अश्रुधुराच्या गोळ्या आणि सौम्य लाठीचार्ज करावा लागला," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, "परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. बडगामहून येणारी आणि जाणारी वाहतूक नारकारामार्गे वळवण्यात आली आहे. विमानतळ रस्ता हा श्रीनगरला जाणारा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल."

विविध भागात निदर्शने :काल, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी एकता आणि सहानुभूती व्यक्त करण्यासाठी भेट दिली. तथापि, आंदोलकांनी एलजीकडून आश्वासनासाठी आग्रह धरला. तसेच श्रीनगर शहरासह काश्मीरच्या विविध भागात निदर्शने सुरू आहेत. काल, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात एका सरकारी कार्यालयात घुसल्यानंतर भट यांच्यावर अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या.

राहुल भट यांच्यावर अंत्यसंस्कार : चाडूरा तहसील कार्यालयातील कर्मचारी राहुल भट यांच्यावर शुक्रवारी बंतलाब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एडीजीपी जम्मू मुकेश सिंग, विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि उपायुक्त अवनी लवासा स्मशानभूमीत उपस्थित होते. स्थानिकांनी या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आणि खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याची मागणी केली.राहुल भट यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक अल्पवयीन मुलगी असा परिवार आहे. त्याची पत्नी आणि मुलगी बडगाम जिल्ह्यातील शेखपोरा स्थलांतरित वसाहतीत त्याच्यासोबत राहात होत्या. दक्षिण काश्मीरच्या मट्टनमधील भाजपचे नगरपाल राकेश कौल म्हणाले की, दहशतवाद्यांनी केलेल्या निवडक हत्या संपूर्ण समुदायासाठी, विशेषत: खोऱ्यात सेवा करणाऱ्यांसाठी चिंतेचे कारण आहेत. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काश्मीरला परतलो आहोत आणि आमच्या मुळांशी पुन्हा संबंध निर्माण करण्याच्या आशेने, ते म्हणाले.

हेही वाचा : Arrest LeT Terrorist In Baramulla : एलईटी संघटनेच्या एका दहशतवाद्याला बारामुल्ला पोलिसांकडून अटक

Last Updated :May 13, 2022, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details