महाराष्ट्र

maharashtra

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये निदर्शने; पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी

By

Published : Sep 7, 2021, 6:06 PM IST

Updated : Sep 7, 2021, 6:46 PM IST

काबूलमध्ये धाडसी कृत्य घडले आहे. हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक, विशेषत: महिलांनी काबूलमध्ये निदर्शने केली. याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर प्रदर्शित झाला आहे. यात 'फ्रिडम, फ्रिडम' अशा घोषणा देताना महिला दिसून आल्या.

काबूल निदर्शने
Protests Kabul

हैदराबाद -काबूलमध्ये धाडसी कृत्य घडले आहे. हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक, विशेषत: महिलांनी काबूलमध्ये निदर्शने केली. याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर प्रदर्शित झाला आहे. यात 'फ्रिडम, फ्रिडम' अशा घोषणा देताना महिला दिसून आल्या.

हेही वाचा -अनिल देशमुखांचे वकील आणि CBI चे उपनिरीक्षकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

निदर्शकांनी पाकिस्तानने देश सोडून जावे, असे सागणारे फलक हाती धरत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा प्रचंड समूह, ज्यात महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता, काबूल येथील पाकिस्तानच्या दुतावाससमोर जमा झाला होता. तालिबानने प्रेस स्वतंत्रतेचे आश्वासन दिल्यानंतरही पत्रकारांना निषेधाचे चित्रीकरण करण्यापासून रोखण्यात आले, असे टोलोचे वृत्त आहे.

तालिबानचा हवेत गोळीबार

विरोध करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानने हवेत गोळीबार केला. घाबरलेले नागरिक घटनास्थळावरून पळ काढत असल्याचे व्हिडिओत दिसून आले. विशेष म्हणजे, नॅशनल रेझिस्टन्स ऑफ अफगाणिस्तान ज्याला नॉरदर्ण अलायन्स देखील म्हणतात, याचा नेता अहमद मसूद याने काल राष्ट्रीय उठावाची हाक दिली होती, त्यानंतर हा निषेध झाला. काल एका भावनिक ऑडिओ संदेशात मसूद याने, तुम्ही कुठेही असाल, अंदर किंवा बाहेर, आपल्या देशाचा सन्मान, स्वातंत्र आणि समृद्धी यांसाठी राष्ट्रीय उठाव सुरू करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो, असे सांगितले होते. मसूद आणि उर्वरित प्रतिकार शक्ती या पंजशीर खोऱ्यात जे प्रतिकारासाठी प्रख्यात आहे तेथे भूमिगत झाले आहेत.

आयएसआय प्रमुख आणि तालिबानमध्ये बैठक

पाकिस्तान तालिबानशी समन्वय साधून आहे, अशी अफवा असताना अफगाणिस्तानातील नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाटही उसळली आहे. विशेष म्हणजे, रविवारी तालिबान आणि पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्यात बैठक झाल्याची पुष्टीही तालिबानने केली आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना हमीद आणि तालिबान नेता मुल्ला अब्दुल गणी बरादर यांच्यात ही बैठक झाली आहे.

हेही वाचा -INS 'Hansa' Diamond Jubilee : गोव्याच्या मुक्तीसंग्रामात नौदलाचे विशेष योगदान, राष्ट्रपतींकडून गौरवोद्गार

Last Updated :Sep 7, 2021, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details