महाराष्ट्र

maharashtra

Prashant Kishor Declined To Join Congress : काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास प्रशांत किशोर यांचा नकार

By

Published : Apr 26, 2022, 5:47 PM IST

अनेक दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात जोरदार चर्चेच्या फेऱ्या सुरु ( Prashant Kishor will join the Congress ) होत्या. त्यानंतर आज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला ( Prashant Kishor Declined To Join Congress ) आहे.

prashant kishor
प्रशांत किशोर

नवी दिल्ली:अनेक दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा ( Prashant Kishor will join the Congress ) होती. किशोर यांनी अनेकदा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली ( Prashant Kishor meet soniya gandhi ) होती. मात्र त्यांच्यात आणि काँग्रेस मध्ये झालेल्या जोरदार चर्चेनंतर, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला ( Prashant Kishor Declined To Join Congress ) आहे.

रणदीप सुरजेवाला यांचं ट्विट : "काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या प्रेझेंटेशन आणि चर्चेनंतर, एक अधिकार प्राप्त कृती गट 2024 ची स्थापना काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे. त्यांना ( प्रशांत किशोर ) परिभाषित जबाबदारीसह गटाचा एक भाग म्हणून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे कौतुक करतो, असे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी केले.

प्रशांत किशोर यांचे ट्विट : मी काँग्रेस पक्षात सामील होण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची कॉंग्रेसची ऑफर नाकारली आहे. माझ्या नम्र मतानुसार, परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असं ट्विट किशोर यांनी केलं आहे.

हेही वाचा : Love Jihad case: नाव बदलून केलं हिंदू मुलीशी लग्न, नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकत दिरांसह मौलानाने केला बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details