महाराष्ट्र

maharashtra

Politics on Chandrayaan ३ : 'आता अदानी चंद्रावर बांधणार फ्लॅट्स, शुद्ध शाकाहारींसाठीच मिळणार घरं'

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 5:29 PM IST

Updated : Aug 27, 2023, 7:18 PM IST

भारताची 'चंद्रयान-3' मोहीम यशस्वी झाली. या यानाचं 23 ऑगस्टला सायंकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं. यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यासोबत 'चंद्रयान-3' च्या यशाचं श्रेय घेण्यासाठी राजकारणही सुरू झालं. (Politics on Chandrayaan 3) (Chandrayaan 3 Mission) (Mahua Moitra on Adani Chandrayaan Mission) (Adani Flats on Moon)

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली - अंतराळ क्षेत्राचा पाया हा काँग्रेसच्या काळात घातला असल्यानं याचं श्रेय काँग्रेसला जात असल्याचा दावा काँघ्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सध्या नवीन क्रांती घडवली असल्यानं ही ऐतिहासिक कामगिरी 'इस्रो'नं केली. त्यामुळं याचं श्रेय भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. तर चंद्रयानच्या यशाचं श्रेय हे इस्रोच्या वैज्ञानिकांचं असल्याचं मत इतर राजकीय पक्षांनी व्यक्त केलंय. त्यामुळे 'चंद्रयान' जरी चंद्रावर सुखरुप पोहचलं असलं तरी इकडं देशात मात्र श्रेयवादाची लढाई सुरू झालीयं. (Politics on Chandrayaan 3) (Chandrayaan 3 Mission) (Mahua Moitra on Adani Chandrayaan Mission) (Adani Flats on Moon)

'टीएमसी'चा मोदी सरकारवर हल्ला - 'चंद्रयान -3' हे चंद्रावर दाखल झालं. त्यामुळं आता चंद्रावर फ्लॅट बांधण्याचं काम अदानीकडं सोपवलं जाईल आणि त्यात मुस्लिमांना प्रवेश नसेल, असा खोचक टोला 'टीएमसी'चे खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारला लगावलाय.

श्रेयवादाची लढाई सुरू - एकीकडं 'चंद्रयान-३' मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश उत्साहात असताना दुसरीकडं राजकारण मात्र काही कमी होत नाहीये. काँग्रेस पक्षानं त्यांच्या काळात केलेल्या कामाचं श्रेय स्वत:ला देण्याचा प्रयत्न केलाय. तर इतर विरोधी पक्षांनी या यशाचं श्रेय वैज्ञानिकांना दिलंय. याचं श्रेय वैज्ञानिकांसोबतच मोदी सरकारलाही गेलं पाहिजे, असं भाजपाचं मत आहे. त्यामुळे देशात श्रेयवादाची लढाई जोरात सुरुये. त्यामुळे मुख्य राजकीय पक्षांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असल्याचं दिसून येतंय.

पंतप्रधान मोदींकडून वैज्ञानिकांचं अभिनंदन -चंद्रयानच्या लँडिंगवेळी पंतप्रधान मोदी परदेशातून ऑनलाइन कनेक्ट झाले होते. त्यानंतर परदेश दौऱ्यावरून परतल्यावर मोदींनी थेट बंगळुरू गाठलं. तेथं गेल्यानंतर त्यांनी 'इस्रो'च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. रविवारी 'मन की बात' कार्यक्रमातही याचा उल्लेख करण्यात आला. तसेच मोदी बंगळुरुला गेले होते तेव्हा त्यांनी तिथे रोड शो देखील केला होता. यावरुनही काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

निवडणुकांमध्ये गाजणार मुद्दा - निवडणुकीदरम्यानही पंतप्रधान मोदी चंद्रयानच्या यशाचा उल्लेख करतील, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार म्हणाले की, एखाद्या राजकारण्यानं निवडणुकीदरम्यान अशा यशाचा उल्लेख केल्यास आश्चर्य वाटायला नको. देशानं एवढी मोठी कामगिरी केली असताना नेता म्हणून अशा संधी क्वचितच येतात आणि कोणताही सार्वजनिक नेता ही संधी सोडू शकत नाही.

हेही वाचा -

  1. ISRO : चंद्रयानानंतर आम्ही मंगळ किंवा शुक्रावर मोहिमा करण्यास सक्षम - इस्रो प्रमुख एस सोमनाथ
  2. ISRO Exam Cheating : इस्रोच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या तिघांना अटक, 'असे' फुटले बिंग
  3. ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर
Last Updated :Aug 27, 2023, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details