महाराष्ट्र

maharashtra

माझ्या भाषणांमध्ये अडचण निर्माण करणं, हे एक सुनियोजित षडयंत्र - नरेंद्र मोदी

By

Published : Feb 10, 2021, 5:16 PM IST

Updated : Feb 10, 2021, 7:38 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. यावेळी त्यांच्या भाषणामध्ये विरोधकांनी गदारोळ घातला. यावेळी मोदींनी विरोधकांवर टीका केली. माझ्या भाषणांमध्ये अडचण निर्माण करणं, हा एक सुनियोजत कट आहे. त्यांच्या अफवांचा भांडाफोड होईल. म्हणून विरोधीपक्षांकडून गदारोळ घालण्यात येत आहे. माझ्या भाषणानं काँग्रेस उघडी पडेल अशी भीती त्यांना आहे, असे मोदी म्हणाले

मोदी
मोदी

नवी दिल्ली -राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. तसेच काळे कायदे वापस घ्या, अशी घोषणाबाजी केली. यावेळी मोदींनी काँग्रेसेचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी समज दिली. आता फार झालं, अधीर रंजनजी आता हे योग्य नाही. मी तुमचा आदर करतो, असे प्रत्युत्तर मोदींनी चौधरींना दिले.

मोदींनी काँग्रेसेचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी समज दिली

भाषणामध्ये गदारोळ घातल्यानंतर मोदींनी विरोधकांवर टीका केली. माझ्या भाषणांमध्ये अडचण निर्माण करणं, हा एक सुनियोजत कट आहे. त्यांच्या अफवांचा भांडाफोड होईल. म्हणून विरोधीपक्षांकडून गदारोळ घालण्यात येत आहे. माझ्या भाषणानं काँग्रेस उघडी पडेल अशी भीती त्यांना आहे, असे मोदी म्हणाले.

अफवाचे शेतकरी बळी -

कोरोना काळातच तीन कृषी कायदे आणले. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हे कायदे आणले आहेत. या कायद्यांविरोधात मुद्दाम अफवा पसरवण्यात येत आहेत. विरोधकांनी पसरवलेल्या अफवाचे शेतकरी बळी ठरले आहेत, असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न -

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकार आदर करतं. हे सभागृह आदर करतं, हे सरकारही करतं. शेतकऱ्यांच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सरकारचे वरिष्ठ मंत्री सतत शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. पंजाबमधील आंदोलन सुरू झाले होते. तेव्हापासून चर्चा करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांचा फायदा हाच हेतू -

हा देश देशवासियांसाठी आहे. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, हाच आमचा शुद्ध हेतू आहे. कायदे लागू झाल्यानंतर देशात एमएसपी आणि बाजार समित्या बंद झालेल्या नाहीत. एमएसपीवरील खरेदीही वाढली आहे, असे मोदी म्हणाले.

Last Updated : Feb 10, 2021, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details