महाराष्ट्र

maharashtra

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन पुन्हा गदारोळ; लोकसभेत पुन्हा विरोधकांची घोषणाबाजी सुरु

By

Published : Jul 25, 2023, 8:50 AM IST

Updated : Jul 25, 2023, 2:18 PM IST

मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला आहे. आजही संसदेत विरोधक मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी गदारोळ करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Parliament Monsoon Session 2023
संपादित छायाचित्र

नवी दिल्ली :मणिपूर हिंसाचारामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलाच गदारोळ करत आहेत. मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सरकार मणिपूर प्रकरणावर चर्चेला तयार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत असले, तरी विरोधक ऐकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे आजही विरोधक संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकराला घेरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे.

LIVE Update :

  • सरकार चर्चेसाठी तयार :केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सरकार संसदेत मणिपूर प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा हल्लबोल केला आहे.
  • राज्यसभेतही विरोधक आक्रमक :मणिपूर प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राज्यसभेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
  • लोकसभा दोन वाजेपर्यंत तहकूब :मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक आक्रमक झाल्यामुळे लोकसभा दोन बाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला आहे.
  • भाजपच्या संसदीय समितीची बैठक :मणिपूर प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू असताना भाजपने आज संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.

मणिपूर प्रकरणावर गदारोळ होण्याची शक्यता :संसदेचे पावसाळी अधिवेशनात सलग तिसर्‍या दिवशी कोणतेही काम झाले नाही. मंगळवारी पावसाळी अधिवेशनात चौथ्या दिवशीही मणिपूर प्रकरणावर गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करत सोमवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या निदर्शनेमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चर्चेला घाबरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर दुसरीकडे मणिपूर प्रकरणावरुन काँग्रेसशासीत राज्यातील काही तथ्ये उघड होऊ नयेत म्हणून विरोधक पळून जात असल्याचा दावा भाजपने केला आहे.

संजय संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले :राज्यसभेत आपचे खासदार संजय संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांच्या निषेधादरम्यान त्यांनी सभागृहातील वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी संजय सिंग यांच्या चुकीच्या वर्तनासाठी त्यांना सावध केले होते. मात्र त्यांनी न जुमानले त्यांना निलंबित करण्यात आले. संजय सिंग यांच्या निलंबनामुळे विरोधी पक्षांचा आवाज दाबल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Priyanka Chaturvedi on Manipur Violence: त्या इतर '100 महिला आणि त्यांच्या एफआयआर'चे काय? प्रियंका चतुर्वेदींचा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सवाल
  2. parliament monsoon session : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखडांनी आप खासदार राघव चढ्ढांना फटकारले
Last Updated : Jul 25, 2023, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details