महाराष्ट्र

maharashtra

हरयाणात एक हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

By

Published : Jan 27, 2021, 12:23 PM IST

पलवल येथे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यात पोलीस आणि आंदोलकांत चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी भारतीय दंड संविधानातील ३०७, ३२३ आणि १८६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

पलवल हिंसाचार
पलवल हिंसाचार

पलवल -राजधानी दिल्लीत ज्या प्रमाणे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती तशी रॅली हरयाणातील पलवल येथही काढण्यात आली होती. रॅलीदरम्यान पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्यांतर आज पोलिसांनी सुमारे १ हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केली नाही.

पलवलमध्ये रॅलीला हिंसक वळण -

हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

पलवल येथे काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यात पोलीस आणि आंदोलकांत चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी भारतीय दंड संविधानातील ३०७, ३२३ आणि १८६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीत लाल किल्ल्यावर कब्जा -

दिल्लीत काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा करत झेंडा फडकावला. आंदोलनादरम्यान सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, तरीही शांततेत सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. हिंसक झालेल्या आंदोलकांनी पोलीस गाड्यांचे आणि मालमत्तेचे नुकसान केले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी वेगाने जमावात ट्रॅक्टरही घुसवले. एक ट्रॅक्टर पलटी होवून आंदोलकाचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी रॅलीचा मार्ग बदलून नियमभंग केल्याचे दिल्ली पोलिसांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर दुपारी अधिकृत वक्तव्य जारी केले.

आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, कॅप्टन अमरिंदर सिंग, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी आणि संघटनांनीही निषेध नोंदवला. दोन महिने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आजच्या घटनांमुळे गालबोट लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन कृषी कायदे मागे घ्यावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details