महाराष्ट्र

maharashtra

Karnataka CM on government formation : कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना विश्वास

By

Published : May 12, 2023, 5:03 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. यावेळीही भाजपच बाजी मारेल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. एक्झिट पोल काहीही आले असले तरी कर्नाटकात बहुमत भाजपलाच मिळेल असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.

Karnataka CM on government formation
Karnataka CM on government formation

बेंगळुरू:कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपलेच सरकार पुन्हा येईल असे सांगितले आहे. त्यांनी त्याबाबत केंद्रातील भाजपच्या श्रेष्ठींना सांगितले असल्याचेही स्पष्ट केले आहे.

आमची भूमिका एकच आहे. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आपण जादुई आकडा सहज गाठू. कोणत्याही कारणाने युती करण्याची परिस्थिती निर्माण होणा नाही. मी स्वतः हायकमांडच्या नेत्यांना फोन केला आणि त्यांना कर्नाटकातील परिस्थितीबद्दल सांगितले आहे. - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

कर्नाटकातील निकालाचे कल हाती आल्यानंतर भाजपला बहुमत मिळणार नाही असेच जवळ-जवळ सर्वच कल दर्शवत आहेत. त्यामुळे कर्नाटकात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार असे मानण्यात येत आहे. मात्र आपल्याला पूर्ण विजयाचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.ते बेंगळुरूच्या आरटी नगर निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

एक्झिट पोलचे निकाल काहीही असो. मात्र आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आम्ही बहुमताची रेषा नक्की ओलांडणार. मी स्वतः हायकमांडच्या नेत्यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. हायकमांडच्या नेत्यांना विश्वास आहे की भाजप सरकार स्थापन करेल. मी सुरुवातीपासून हेच म्हणत आलो आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही सर्व मतदारसंघ आणि बूथवरून ग्राउंड माहिती आणली आहे. आम्हाला विश्वास आहे, प्रत्येकजण आत्मविश्वासाने सांगत होता की आम्ही जादूई आकडा गाठू. काँग्रेसला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे ते इतर पक्षांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत - मुख्यमंत्री बोम्मई

काँग्रेसचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यांच्याबरोबरही कुणी जायला तयार होत नाही.मात्र तो प्रश्न आमच्यापुढे नाही. आम्ही बहुमत पार करू. असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले. काँग्रेस इतरांची मदत घेण्यासाठी बैठका घेत आहे. त्यांना आम्ही आडवणार नाही. पण सरकार आम्हीच स्थापन करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांशीही पुढील सरकार स्थापनेबाबत चर्चा केल्याची माहितीही बोम्मई यांनी दिली.

येडियुरप्पा यांच्याशी बोम्मईंची चर्चा: एक्झिट पोल सर्वेक्षणात भाजपला धक्का बसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील राजकीय गणितावर चर्चा केली. पक्षाने गोळा केलेली आकडेवारी, बूथ नेत्यांकडून मिळालेला अहवाल आणि सर्वेक्षण अहवाल यावर त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. येडियुरप्पा यांच्याशी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या चर्चेवेळी मंत्री मुरुगेश निरानी, बैराती बसवराज, राज्यसभा सदस्य आणि येडियुरप्पा यांचे सहकारी लहर सिंह उपस्थित होते. मुरुगेश निरानी मुख्यमंत्र्यांच्या आधी येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुरुगेश निरानी यांनी येडियुरप्पा यांच्याशी काही काळ निकालाबाबत चर्चा केली.

मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट : मंत्र्यांनी एक एक करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचून चर्चा केली आहे. एमटीबी नागराज आणि व्ही सोमन्ना यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरटी नगर येथील निवासस्थानी जाऊन काही वेळ चर्चा केली. वरुणा आणि चामराजनगर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या सोमण्णा यांची भेट घेऊन निकालाबाबत चर्चा केली. आतापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू आहे. उद्याचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास सर्वच भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

  1. Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी 'या' नेत्यांनी केली होती बंडखोरी, उद्या होईल फैसला
  2. Heavy Rain in Karnataka : कर्नाटकात पावसाचा हाहाकार, उडुपी आणि मंड्यामध्ये चार जणांचा मृत्यू
  3. Election Commission Decision In Question : निवडणूक आयोग निर्णय बदलणार का? उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details