महाराष्ट्र

maharashtra

Patna Opposition Meeting : पाटणातील विरोधी पक्षांची बैठक संपली; पुढची बैठक अंतिम - नीतीश कुमार

By

Published : Jun 23, 2023, 7:11 AM IST

Updated : Jun 23, 2023, 4:47 PM IST

पाटणा येथे सुरु असलेली विरोधी पक्षांची बैठक आता संपली आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी भाजपविरोधक नेते पाटण्याला पोहोचले होते. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेते गुरुवारीच पाटणाला पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला हजर होते.

आज भाजपविरोधी पक्षांची बैठक
आज भाजपविरोधी पक्षांची बैठक

पाटणा : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी पार पडली आहे. भाजपच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी या बैठकीला 15 हून अधिक विरोधी पक्ष उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.

राहुल गांधींची टीका - देशात मोदीविरोधात लाट आहे. एकत्रित येऊन भाजपला पराभूत करायचे आहे. कर्नाटकमधील निकाल सर्वांना पाहिला आहे. देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. भाजपकडून द्वेष व हिंसाचार पसरविण्याचे काम चालू आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते विरोधी पक्षांच्या बैठकीत बोलत होते.

राहुल गांधींचे पोस्टर -काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी हे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाटण्यात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. विरोधी पक्षांची बैठक सकाळी अकरा वाजता सुरू झाली होती. भाजपने राहुल गांधी यांची तुलना 'देवदास' चित्रपटातील देवदासच्या भूमिकेशी करून खिल्ली उडविली होती. विरोधी पक्षांच्या बैठकीदरम्यान भाजप कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना 'देवदास' चित्रपटातील शाहरुख खानच्या पात्राशी करण्यात आली आहे.

या नेत्यांची हजेरी - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, लालू यादव यांच्यासह अनेत बडे नेते यावेळी बैठकीला हजर होते.

एकी होणार का?- काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, जेडीयूसह १७-१८ पक्षांनी आज एका टेबलावर बसून भाजपच्या विरोधात रणनीतीवर विचारमंथन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते बैठकीच्या आदल्यादिवशी पाटण्यात पोहोचले होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत असे दिग्गज नेते बैठकीला आले आहेत.

समर्थकांची विमानतळावर गर्दी : आरजेडी आणि जेडीयूचे कार्यकर्ते पाटणा विमानतळाबाहेर विरोधी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी जमले होते. ढोल-ताशा वाजवत कार्यकर्त्यांनी विमानतळावर येणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले. जेएमएम समर्थकांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे जोरदार स्वागत केले. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेदेखील पाटण्यात पोहोचले होते.

ममता यांनी लालू यादवांचे दर्शन घेतले : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी दुपारी साडेचार वाजता पाटणा येथे पोहोचल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्यासोबत टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जीही होते. विमानतळावरून ममता थेट लालू यादव यांना भेटायला गेल्या. यावेळी त्यांनी लालू यादव यांचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ संवाद झाला. बैठकीनंतर ममता म्हणाल्या की, देशाला 'आपत्ती'पासून वाचवायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करावे लागेल.

मायावती काय म्हणाल्या: आज पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष जे मुद्दे एकत्र उपस्थित करत आहेत. अशा स्थितीत नितीश कुमार साहेब, विरोधी पक्षनेत्यांची आज पाटणा येथे बैठक घेत आहेत. या बैठकीला एक म्हण लागू होते ती म्हणजे 'दिल मिले ना मिले हाथ मिलते रहे'.

हेही वाचा -

  1. Opposition Meeting in Patna : विरोधी पक्षांची बैठक महत्वाची; पण, परस्पर भांडणं अजूनही सुरूच
  2. Threat Call To PM Modi : पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी
Last Updated :Jun 23, 2023, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details