महाराष्ट्र

maharashtra

tree falls in private school in chandigarh: चंदिगडमध्ये शाळेत झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 19 जखमी

By

Published : Jul 8, 2022, 2:25 PM IST

चंदिगडच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शुक्रवारी मोठे झाड पडले. त्यात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. तर १९ मुले जखमी झाली. जखमींना सेक्टर-16 जीएमएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंडीगडमधील खासगी शाळेत झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
चंडीगडमधील खासगी शाळेत झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

चंदीगड :येथील एका खासगी शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. सेक्टर-९ येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला तर अनेक मुले जखमी झाली. ही घटना घडली त्यावेळी शाळेत दुपारच्या जेवणाची वेळ सुरू होती आणि मुले खेळत होती.

चंडीगडमधील खासगी शाळेत झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेत झाड कोसळले, एका मुलाचा मृत्यू, 19 जखमी - अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. चंदीगडचे गृह सचिव नितीन यादव यांनी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या अपघातात (चंडीगडमध्ये झाड पडून) १९ मुले जखमी झाली आहेत. बहुतांश जखमींवर चंदीगडमधील सेक्टर-16 रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुटुंबीयांनी काढला गोंधळ - अपघाताची माहिती मिळताच एकच घबराट पसरली आणि काही वेळातच पालकही शाळेत पोहोचले. शाळेजवळ एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे उन्हाळी सुट्या संपल्यानंतर १ जुलैपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर अपघातानंतर शाळेत मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पोलिसांसह प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

200 वर्षे जुने होते झाड - ही दुर्घटना ज्या झाडामुळे झाली ते झाड खूप जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. (tree falls in private school). हे 200 वर्ष जुने हेरिटेज झाड होते. ज्याच्याखाली 20 मुले होती. शाळेच्या आत असलेल्या या झाडामुळे स्कूल बसचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा - Fake note smuggler arrested in Muzaffarpur: मुझफ्फरपूरमध्ये बनावट नोटा तस्कराला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details