महाराष्ट्र

maharashtra

विद्यार्थाला दिली तालिबानी शिक्षा; शिक्षकाने चिमुकल्याला लटकवले उलटे

By

Published : Oct 29, 2021, 3:15 PM IST

Updated : Oct 29, 2021, 5:40 PM IST

मिर्झापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत दुपारच्या वेळेत पाणीपुरी खाल्ल्यानं दुसरीच्या मुलावर मुख्याध्यापकांनी राग काढला.त्यांनी मुलाला इमारतीच्या वरच्या मजल्यावर गॅलरीतून खाली उलटे लटकवले. या प्रकाराचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

on-mischief-of-student-headmaster-held-his-feet-and-hanged-him-upside-down-from-the-building-in-mirzapur
विद्यार्थाला दिली तालिबानी शिक्षा; शिक्षकाने चिमुकल्याला लटकवले उलटे

मिर्झापूर - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत दुपारच्या वेळेत पाणीपुरी खाल्ल्यानं दुसरीच्या मुलावर मुख्याध्यापकांनी राग काढला.त्यांनी मुलाला इमारतीच्या वरच्या मजल्यावर गॅलरीतून खाली उलटे लटकवले. या प्रकाराचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बीएसएने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दाखल केली असून मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकाला घेतले ताब्यात -

उत्तर प्रदेशमधील मिर्डापूर जिल्ह्यात अहरौरा येथील एका शाळेत शिक्षकाने चिमुरड्या विद्यार्थ्याला पायाला धरून इमारतीच्या बाहेर उलटे लटकवले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून प्रबंधक तथा शाळेचे मुख्याध्यापक मनोज कुमार विश्वकर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्यार्थ्याला लटकवले उलटे -

सदभावना शाळेतील संचालक तथा मुख्याध्यापक मनोज यांनी दुसरीच्या विद्यार्थाच्या शरारतीला कंटाळून त्याला समजून सांगण्याच्या ऐवजी त्याला थेट इमारतीच्या बाहेर गॅलरीत उलटे पकडले होते. यावेळी मुलगा हा खूप घाबरला होता आणि खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होता तरीही मुख्याध्यापकावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यावेळी प्राध्यापकाच्या आजू-बाजूच्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उभे होते. तेही या भयावह शिक्षेने थरथरत होते. त्याचवेळी या घटनेचा कोणीतरी फोटो आणि व्हिडिओ काढला आणि सोशल मीडिया शेअर केला. तो सध्या सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर पालक चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश -

मुलाच्या वडीलाचे असे म्हणणे आहे की, सर्व मुले हे पाणी पुरी खात होते, यावेळी तो शरारत करत होता. त्याच्या या शरारतीवर नाराज झालेल्या मुख्याध्यापकाने अशी भयावह शिक्षा दिली आहे. सदभावना शाळेतील मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा याप्रकरणावर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश हे बीईओला दिले आहेत.

हेही वाचा -सहा पीक विमा कंपन्यांना दणका; राज्य सरकारची नोटीस

Last Updated : Oct 29, 2021, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details