महाराष्ट्र

maharashtra

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची हायकोर्टात धाव, NSE Phone Tapping प्रकरण भोवण्याची शक्यता

By

Published : Aug 12, 2022, 7:36 PM IST

NSE फोन टॅपिंग प्रकरणातील NSE phone tapping case आरोपी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey यांनी ट्रायल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली Sanjay Pandey files bail plea in Delhi High Court आहे. उच्च न्यायालय 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे.

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

नवी दिल्ली एनएसई फोन टॅपिंग प्रकरणातील NSE phone tapping case आरोपी आणि मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त संजय पांडे Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला Sanjay Pandey files bail plea in Delhi High Court आहे. संजय पांडे यांच्या जामीन याचिकेवर हायकोर्ट १६ ऑगस्टला सुनावणी करणार आहे. ट्रायल कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय पांडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणातील आरोपी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जामीन अर्ज राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 4 ऑगस्ट रोजी फेटाळला आहे.

विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी जामीन फेटाळण्याचे आदेश दिले. संजय पांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 2 ऑगस्ट रोजी न्यायालयाने संजय पांडेला 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी ईडीने संजय पांडे आणि रवी नारायण यांच्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सीबीआयही तपास करत आहे.

तपासादरम्यान, सीबीआयने संजय पांडेशी संबंधित असलेल्या आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या परिसरातून काही बिल पावत्या, रेकॉर्डिंगचे नमुने, रेकॉर्डिंगच्या मूळ टेप आणि सर्व्हरसह दोन लॅपटॉप जप्त केले होते. संजय पांडे यांनी चित्राला मदत करण्यासाठी एमटीएनएलच्या फोन लाइन टॅप करून ४ कोटी ५४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. चित्रा रामकृष्ण यांना NSE ची गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल 6 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

हेही वाचाED Arrested Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details