महाराष्ट्र

maharashtra

Nora Vs Jacqueline: नोराची जॅकलिन विरोधात तक्रार! म्हणाली, मला मुद्दाम 'त्या' प्रकरणात ओढले

By

Published : Dec 12, 2022, 7:51 PM IST

Updated : Dec 12, 2022, 8:05 PM IST

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस खंडणी प्रकरणी चर्चेत आहे. दिल्लीत तिहार जेलमध्ये अटक असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. दरम्यान, आता नोराने दिल्ली कोर्टात जॅकलिन आणि काही मीडिया कंपन्यांविरोधात मानहानिची केस केली आहे.

Nora Vs Jacqueline
नोरा फतेहीने जॅकलिन विरोधात केली तक्रार

नवी दिल्ली - सुकेश चंद्रशेखरशी संबंधीत २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसने मुद्दाम माझे नाव घेतले आहे. या प्रकरणात माझे नाव आल्यामुळे माझी प्रतिमा खराब झाली आहे असा आरोप करत नोराने जॅकलिनविरोधात दिल्ली कोर्टात मानहानिची केस दाखल केली आहे. माझे नाव मुद्दाम घेण्यात आले आहे. सुकेशने कधीही माझ्याशी संपर्क साधला नव्हता असा दावाही नोराने केला आहे.

Tweet

सुकेशकडून महागडे गिफ्ट घेतल्याचा आरोप - यामध्ये २०० कोटी रुपये खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही EDच्या रडारावर होत्या. त्यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. जॅकलिन प्रमाणेच नोरावर देखील सुकेशकडून महागडे गिफ्ट घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पण चौकशीदरम्यान हे खोटे असल्याचे नोराने सांगितले. सुकेशने नोराला BMW गाडी गिफ्ट म्हणून देण्याचे ठरवले होते. पण नोराने त्याला नकार दिला. सुरुवातीपासूनच नोराला सुकेशवर विश्वास नव्हता. तिने त्याचा फोन नंबर देखील ब्लॉक केला होता अशीही माहिती समोर आली होती.

मानहानीचा खटला -एएनआयने ट्विट केले की, 'नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात २०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. जॅकलीनने द्वेषाने तिच्याविरुद्ध खोटी विधाने केल्याचा आरोप नोराने केला आहे. दरम्यान, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. या प्रकरणी जॅकलिनवर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

Tweet

कशी अडकली? -एका कार्यक्रमात सुकेशची पत्नी लीना हिला भेटल्याचे नोराने चौकशीदरम्यान ईडीला सांगितले होते. लीनाने नोराला गुच्ची बॅग आणि आयफोन गिफ्ट केला होता. त्यामागचे कारण म्हणजे तिचा पती सुकेश तिचा चाहता आहे. यानंतरच लीनाने नोराला सुकेशशी फोनवर बोलायला मिळाले. सुकेशने सांगितले की तो नोराचा चाहता आहे. त्यानंतर शेखरने बॉबीला कार ऑफर केली होती.

Last Updated :Dec 12, 2022, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details