महाराष्ट्र

maharashtra

ISIS Conspiracy Case : कर्नाटकात ISIS च्या दोन अतिरेक्यांना अटक

By

Published : Jan 5, 2023, 10:52 PM IST

रेशान थाजुद्दीन शेख आणि हुजैर फरहान बेग अशी अटक करण्यात आलेल्या ISIS अतिरेक्यांची नावे आहेत. (ISIS Conspiracy Case). हे दोघेही कर्नाटकचे निवासी आहेत. या प्रकरणात इतर दोन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. (ISIS terrorist arrested in Karnataka).

NIA
NIA

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी शिवमोग्गा ISIS कट प्रकरणात (ISIS conspiracy case) सहा ठिकाणी शोध टाकत दोघांना अटक केली आहे. एनआयएने हे छापे कर्नाटकातील दक्षिण कन्नड, शिवमोग्गा, दावणगेरे आणि बेंगळुरू या जिल्ह्यांमध्ये टाकले. (NIA raids in Karnataka). हे प्रकरण आरोपींनी इस्लामिक स्टेट (IS) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना पुढे नेण्यासाठी आणि देशाची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्यासाठी रचलेल्या कटाशी संबंधित आहे.

दोघेही कर्नाटकचे निवासी : कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील शिवमोग्गा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला 19 सप्टेंबर रोजी नोंद झालेल्या आणि गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी NIA द्वारे पुन्हा नोंदणी केलेल्या या प्रकरणात शोध घेतल्यानंतर दोन ISIS अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. रेशान थाजुद्दीन शेख आणि हुजैर फरहान बेग अशी अटक करण्यात आलेल्या ISIS अतिरेक्यांची नावे आहेत. हे दोघेही कर्नाटकचे निवासी आहेत. या प्रकरणात इतर दोन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

क्रिप्टो-वॉलेटद्वारे निधी प्राप्त : तपासात उघड झाले आहे की, आरोपी माझ मुनीरने त्याचा जवळचा सहकारी आणि कॉलेजमित्र रेशान थाजुद्दीन याला कट्टरपंथीय बनवले आहे. एनआयएने सांगितले की, अटक करण्यात आलेले दोन आरोपी रेशान थाजुद्दीन शेख आणि हुजैर फरहान बेग यांना त्यांच्या आयएसआयएस हँडलरकडून क्रिप्टो-वॉलेटद्वारे निधी प्राप्त झाला होता. एजन्सीने आरोपी आणि संशयितांच्या घरांची झडती घेतली असता डिजिटल उपकरणे आणि गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details