महाराष्ट्र

maharashtra

NIA Raid on Khalistani Gangster : खलिस्तानवादी समर्थकांविरोधात कारवाईला गती; 'एनआयए'ची सहा राज्यात छापेमारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:40 AM IST

Updated : Sep 27, 2023, 10:12 AM IST

NIA Raid on Khalistani Gangster : खलिस्तानवादी समर्थकांविरोधात कारवाईला आता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी वेग दिलाय. बुधवारी सकाळी 'एनआयए'नं तब्बल सहा राज्यात छापेमारी केली आहे. भारत-कॅनडा तणावानंतर आता भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली : NIA Raid on Khalistani Gangster : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात 'एनआयए'नं बुधवारी 6 राज्यांमध्ये खलिस्तानवादी प्रकरणांशी संबंधित ठिकाणी छापे (NIA Raid Khalistani Supporters) टाकले आहेत. लॉरेन्स, बंबीहा आणि अर्श डल्ला गँगच्या साथीदारांच्या 51 ठिकाणांवर 'एनआयए'नं छापे टाकले आहेत. खलिस्तानवादी नेता निज्जरची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येमागं भारताचा हात असल्याचा दावा कॅनडानं केला (India Canada Row) होता. हा आरोप भारतानं फेटाळून कॅनडाला प्रत्युत्तर दिलं होतं.

'एनआयए'कडून सहा राज्यात छापेमारी : बुधवारी पहाटं 'एनआयए'नं पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील तख्तुपुरा गावात एका दारू ठेकेदाराच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर इतर राज्यातही ही छापेमारी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून 'एनआयए'नं खलिस्तानवादी समर्थकांविरोधातील कारवाईला गती दिली आहे. त्यामुळं आता खलिस्तानवादी समर्थकांचे धाबे दाणाणले आहेत.

भारतीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय : 'खलिस्तानवादी' या एका संघटनेवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वाद उफाळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर 'एनआयए'नं देशभरात खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या आणि त्यांच्या विचारसरणीशी संबंधित असलेल्यांवर कारवाई केली जात आहे. राज्सथान, दिल्लीसह एकूण सहा राज्यात ही छापेमारी करण्यात आली.

मालमत्तेची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न : 'एनआयए'नं खलिस्तानशी संबंध असलेल्या दहशतवादी आणि गँगस्टर यांची एक लांबलचक यादी जाहीर केली होती. यासोबतच त्या दहशतवादी आणि गँगस्टरच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. अशा लोकांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही माहिती आढळून आल्यास त्याबाबत माहिती देण्याचं आवाहन 'एनआयए'नं केलंय.

हेही वाचा -

  1. Khalistani Shelter in Nanded : 'एनआयए'कडून गँगस्टर्सची यादी जाहीर; नांदेडात आश्रय घेण्याची शक्यता, पोलीस सतर्क
  2. Nijjar Murder Case : निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचे एजंट असू शकतात - जस्टिन ट्रूडो
  3. CIA-style: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कॅनडाला दिली माहिती
Last Updated : Sep 27, 2023, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details