महाराष्ट्र

maharashtra

Golden Celebration: सुवर्ण कामगिरीनंतर नीरजच्या घरासमोर जल्लोष, जवानांकडून तिरंगा फडकवत आनंद साजरा

By

Published : Aug 7, 2021, 7:31 PM IST

Updated : Aug 7, 2021, 7:43 PM IST

ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

निरज चोप्रा
निरज चोप्रा

ऍथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. हरियाणामध्ये नीरज चोप्राच्या घरासमोर जल्लोषाचे वातावरण आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

जवानांनी तिरंगा फडकवत साजरा केला आनंद

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी जम्मूमध्ये आनंद साजरा केला आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अभिनंदन केले आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीनंतर नाचत आनंद साजरा केला आहे.

Last Updated : Aug 7, 2021, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details