रांची -नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने छत्तीसगडमधील नारायणपूर हादरले आहे. आयटीबीपी जवानांकडून कडेमेटा आणि कडेनार कॅम्पमध्ये शोधमोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण आले आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी पळून गेले आहेत. आयटीबीपीने परिसरात वेगाने शोधमोहिम सुरू केली आहे.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयबीटीपीचे असिस्टंट कमांडंटसहित 2 जवानांना वीरमरण आले आहे. नक्षलवाद्यांनी जवानांकडील एके-47 हत्यार, दोन बुलेटप्रुफ जॅकेट आणि वॉकी टॉकीही पळविली आहे. माहितीनुसार नारायणपूर आणि बारसूर मार्गावर आयबीटीपीची गस्त सुरू होती. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आयटीबीपीचे असिस्टंट कमाडंट सुधाकर शिंदेसहित 2 जवान हुतात्मा झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक यू. उदय किरण यांनी पुष्टी केली आहे.
हेही वाचा-ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची काढली पोस्ट, नियमभंग केल्याचे दिले कारण