महाराष्ट्र

maharashtra

हिंदू युवकाशी जडले प्रेम, पूर्वीची झीनत आता झाली ज्योती, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन घेतली सप्तपदी

By

Published : Jan 17, 2022, 12:50 AM IST

यूपीच्या बरेलीमध्ये दोन वेगवेगळ्या समाजातील प्रेमी युगुलाने पळून जाऊन लग्न केले. मुलीने धर्म बदलून हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू युवकाशी जडले प्रेम, पूर्वीची झीनत आता झाली ज्योती, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन घेतली सप्तपदी
हिंदू युवकाशी जडले प्रेम, पूर्वीची झीनत आता झाली ज्योती, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन घेतली सप्तपदी

बरेली : जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने धर्माची बंधने झुगारून एकमेकांसोबत लग्नाची गाठ बांधली. प्रेमीयुगुल एकाच गावातील असले तरी भिन्न समाजामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. यानंतर प्रेमी युगल घरातून पळून गेले आणि एका मंदिरात जाऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न ( muslim girl marries Hindu boy ) केले. तर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगत प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध बरेलीच्या कँट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू युवकाशी जडले प्रेम, पूर्वीची झीनत आता झाली ज्योती, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन घेतली सप्तपदी

कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहणाऱ्या झीनतचे तिच्या गावात राहणाऱ्या सचिन शर्मासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. मात्र, दोघेही भिन्न समाजाचे असल्याने त्यांच्या प्रेमात त्यांच्या कुटुंबातील सदस्य अडसर ठरले. यानंतर झीनत आणि सचिनने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि 10 जानेवारी रोजी घरातून पळ काढला. दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले.

हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न

सचिन शर्मासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणारी झीनत आता ज्योती बनली ( zeenat became Jyoti in bareilly ) आहे. तिने आपले नाव बदलून ज्योती शर्मा ठेवले आहे. झीनत उर्फ ​​ज्योती शर्मा सांगतात की, तिला हिंदू धर्मात रस ( muslim girl changed religion in bareilly ) आहे आणि पूजापाठ करायला आवडते, म्हणून तिने तिचा प्रियकर सचिन शर्मासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. तिने हे पाऊल कोणत्याही जबरदस्ती किंवा प्रलोभनातून उचललेले नाही, तर स्वतःहून आनंदाने लग्न केले आहे.

कुटुंबियांकडून जीवाला धोका

जीवाला धोका असल्याचे सांगून झीनत उर्फ ​​ज्योतीने कँट पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे दाद मागितली आहे. पतीचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्रास देऊ नये, असे तिने सांगितले आहे. मुलीचे म्हणणे आहे की, कुटुंबीयांकडून तिच्या जीवाला धोका आहे, कारण तिने हिंदू धर्म स्वीकारून त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्याचवेळी, अगस्त मुनी आश्रमाचे पुजारी केके शंखधार, ज्यांनी दोघांचा विवाह केला, त्यांनी सांगितले की, झीनत या मुस्लिम धर्माच्या मुलीला हिंदू धर्माच्या प्रियकराशी लग्न करायचे होते आणि ती प्रौढ आहे. यानंतर दोघांनी स्वतःहून लग्न केले. मुलीने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून ज्योती ठेवले.

तिघांवर गुन्हा दाखल

झीनतच्या कुटुंबीयांनी सचिन शर्मा आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कँट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, प्रेमी युगुलाचा शोध सुरू केला. त्याचवेळी पोलिसांनी झीनत उर्फ ​​ज्योतीला ताब्यात घेतले आहे. तिची वैद्यकीय तपासणी करून तिला न्यायालयात हजर करण्यात आले. कँट पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांनी सचिन शर्मा आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितले आहे. सध्या पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून, तिची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details