महाराष्ट्र

maharashtra

इंडिगोला 1.20 कोटी तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला 60 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

By PTI

Published : Jan 18, 2024, 8:06 AM IST

Updated : Jan 18, 2024, 8:15 AM IST

Mumbai Airport Incident : मुंबई विमानतळावर धावपट्टीवर बसून प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी विमान वाहतूक नियामकनं इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा तर मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) या कंपनीला 60 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.

Mumbai Airport Incident
Mumbai Airport Incident

नवी दिल्ली Mumbai Airport Incident : ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) नं इंडिगोला 1.20 कोटी रुपयांचा तर मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) या कंपनीला 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. विमान वाहतूक नियामक (DGCA) नं या घटनेबाबत एमआयएएलला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2195 चे प्रवासी रविवारी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर बसून जेवण करत होते, या प्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय.

काय आहे नेमकं प्रकरण : रविवारी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2195 या विमानाला 12 तास उशीर झाला. त्यानंतर दिल्लीला जाण्याऐवजी हे विमान मुंबईकडं वळवण्यात आलं होतं. मात्र दाट धुक्यामुळं विमान एका तासानंतर रात्री 11.10 च्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरलं. इंडिगो एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना मुंबई विमानतळावर उतरण्यास सांगण्यात आलं होतं. ज्यामुळं त्यांचा संताप आणखी वाढला. यातच प्रवाशांनी टर्मिनल इमारतीच्या दिशेनं जाण्यास नकार दिला आणि विमान खाली उतरले प्रवासी धावपट्टीवर बसले. यानंतर प्रवाशांनी तिथंच बसून जेवन करायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ X (पुर्वीचं ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओत प्रवाशांच्या मागील धावपट्टीवर इतर विमानंही घेताना दिसत होते.

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित :मुंबई विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी एअरलाइन्सच्या व्यवस्थापनावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. हा वाद वाढत असल्याचं पाहून इंडिगो एअरलाइन्सनं याप्रकरणी माफीही मागितलीय. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याप्रकरणी मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि इंडिगोला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता दंडात्मक कारवाईही करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. मुंबई विमानतळावर विमाने उभी करण्याच्या जागीच बसून जेवण; इंडिगोसह मुंबई विमानतळ प्रशासनाला नोटीस, कंपनीनं मागितली माफी
  2. Pilot Death: नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू, विमानात चढण्यापूर्वीच काळाचा घाला
  3. इंडिगोची वेबसाईटसह इतर ऑनलाईन सेवा बंद, जाणून घ्या कारण
Last Updated :Jan 18, 2024, 8:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details