महाराष्ट्र

maharashtra

MONSOON SESSION 2023 : टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित

By

Published : Aug 8, 2023, 12:44 PM IST

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांना उर्वरित अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित केले. यांच्यावर दिल्ली सेवा विधेयकावरील जोरदार चर्चे दरम्यान प्रसिद्धीसाठी सभागृहात 'नाटकी वर्तन' केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (MONSOON SESSION 2023 )

TMC MP suspended from Rajya Sabha
टीएमसी खासदार राज्यसभेतून निलंबित

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना मंगळवारी संसदेच्या उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेतून निलंबित केले. डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतील असभ्य, अशोभनीय वर्तनासाठी चालू संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे नेते पियुष गोयल यांनी सभागृहाच्या कामकाजात सातत्याने अडथळा आणणे, सभापतींची अवज्ञा करणे आणि सभागृहात गोंधळ निर्माण केल्याबद्दल त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. जो सभापतींनी मान्य केला.

तत्पूर्वी, दिल्ली सेवा विधेयक सोमवारी संसदेत मंजूर होण्यापूर्वी, ते राज्यसभेत चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यादरम्यान सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही सभागृहात सतत घोषणाबाजी आणि वारंवार तहकूब केल्यानंतर, राज्यसभेच्या अध्यक्षांनी सोमवारी टीएमसी खासदारावर टीका केली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यान सभागृहाच्या शिष्टाचारात अडथळा आणल्याचा आरोप केला. 2023.

सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी खा. डेरेक ओब्रायन यांच्यावर दिल्ली सेवा विधेयकावरील जोरदार चर्चेदरम्यान प्रसिद्धी मिळविण्यासाठी सभागृहात 'नाटकी वर्तन' केल्याचा आरोप केला. त्यांनी आपले म्हणने राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2023 पर्यंत मर्यादित ठेवण्यास नकार दिल्याने धनखर संतप्त झाले. डेरेक ओब्रायन यांनी केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

सभापती म्हणाले की, ही तुमची सवय झाली आहे. तुम्ही एका रणनीतीनुसार हे करत आहात. तुम्हाला असे वाटते की तुम्ही बाहेर प्रसिद्धीचा आनंद लुटत आहात. तूम्ही राज्यसभेच्या कामकाजाच अडथळे आणत आहात. म्हणाला तूम्ही इथे नाटक करायला आला आहेत का. तुम्ही तशी शपथ घेतली आहे का, तुमची ही हुशारी येथे चालनार नाही. याची मी कठोर दखल घेतो असे म्हणत सभापतींनी टीएमसी सदस्याच्या भाषणातील काही शेरेही काढून टाकले.

हेही वाचा

  1. Parliament Monsoon Session 2023 Updates
  2. Arvind Kejriwal on Delhi Ordinance: दिल्ली सेवा विधेयक म्हणजे चोर दरवाजाने सत्ता बळकावण्याचा भाजपाचा प्रयत्न-अरविंद केजरीवाल

ABOUT THE AUTHOR

...view details