महाराष्ट्र

maharashtra

Mirchi Baba arrested - मध्य प्रदेशातील मिर्ची बाबाला अटक; बलात्काराच्या आरोपाखाली कारवाई

By

Published : Aug 9, 2022, 11:41 AM IST

पोलिसांनी मिर्ची बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली ( Mirchi Baba arrested in gwalior mp ) अटक केली आहे. भोपाळ पोलीस आणि ग्वाल्हेर गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी मिर्ची बाबाला हॉटेलमधून अटक ( Mirchi Baba arrest gwalior ) केली. भोपाळ पोलिसांचे पथक मिर्ची बाबाला अटक करून ( allegations of rape ) तेथून निघून गेले.

Mirchi Baba arrested under allegations of rape
मिर्ची बाबा अटक ग्वालियर

ग्वालियर (म.प्र) - पोलिसांनी मिर्ची बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली ( Mirchi Baba arrested in gwalior mp ) अटक केली आहे. भोपाळ पोलीस आणि ग्वाल्हेर गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी मिर्ची बाबाला हॉटेलमधून अटक ( Mirchi Baba arrest gwalior ) केली. भोपाळ पोलिसांचे पथक मिर्ची बाबाला अटक करून ( allegations of rape ) तेथून निघून गेले. मिर्ची बाबा भोपाळ पोलीस ठाण्यात ३७६ अंतर्गत आरोपी आहे.

हेही वाचा -Har Ghar Tiranga: ITBP महिला सैनिकांनी उत्तराखंडमध्ये 17 हजार फुटांवर फडकवला तिरंगा


हॉटेलमधून पकडण्यात आले -कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्री वैराग्यनंद गिरी महाराज उर्फ ​​मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आज सकाळी भोपाळ पोलिसांची टीम ग्वालियरमध्ये पोहचली, जिथे ग्वालियर क्राइम ब्रँचच्या टीमसोबत बाबाला हॉटेलमधून पकडण्यात आले. मिर्ची बाबाला अटक करून भोपाळ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.


महिला पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल -मिर्ची बाबावर भोपाळच्या महिला पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पीडित महिलेने आरोप केला होता की, मिर्ची बाबाने मूल होण्याच्या बहाण्याने गोळ्या खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला होता. याबाबत भोपाळ पोलिसांचे पथक काल रात्री आरोपी मिर्ची बाबाला पकडण्यासाठी ग्वालियरला पोहचले होते. जिथे सकाळी बाबाला हॉटेलमधून अटक करून भोपाळला नेण्यात आले.

वादग्रस्त विधानामुळे असतात चर्चेत -नेहमी चर्चेत राहणारे महामंडलेश्वर स्वामी वैराग्यनंद गिरी महाराज, धर्मगुरू मिर्ची बाबा हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी वादग्रस्त विधान केल्याची माहिती पुढे आली होती. हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे मिर्ची बाबाने म्हटले होते. यासंदर्भात मिर्ची बाबा यांचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये ते सांगत आहेत की हे एका षड्यंत्राखाली होत आहे. 'काली' चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर मिर्ची बाबा म्हणाले होते की, हिंदू धर्माला बदनाम करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. मा कालीचा अपमान होत आहे. निरंजनी आखाड्याचा संत असल्याने मी जाहीर करतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला मी 20 लाख रुपये देईन. आश्रम या वेब सीरिजचे निर्माते हिंदू धर्मावर आघात करत आहेत असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -Har Ghar Tiranga: ITBP महिला सैनिकांनी उत्तराखंडमध्ये 17 हजार फुटांवर फडकवला तिरंगा

ABOUT THE AUTHOR

...view details