महाराष्ट्र

maharashtra

Maulana Taukir Raza Khan Statement : "या.. नरेंद्र मोदी कलमा वाचा, आम्ही तुम्हाला डोक्यावर बसवू" - मौलाना तौकीर रझा खान

By

Published : Jun 19, 2022, 9:51 PM IST

इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा ( Maulana Taukir Raza Khan ) यांनी बरेली येथील इस्लामिया मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला. म्हणाले की या, नरेंद्र मोदी कलमा वाचा, आम्ही तुम्हालाही डोक्यावर बसवू. आम्ही अल्लाहशिवाय कोणाला घाबरत नाही. या सरकारला आम्ही कोणतेही निवेदन देणार नाही.

मौलाना तौकीर रझा खान
मौलाना तौकीर रझा खान

बरेली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ बरेलीतील इस्लामिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा ( IMC chief Maulana Taukir Raza ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. म्हणाले की या, नरेंद्र मोदी कलमा वाचा ( Narendra modi read the kalma ), आम्ही तुम्हालाही डोक्यावर बसवू ( make you sit on the head ). आम्ही अल्लाहशिवाय कोणाला घाबरत नाही. या सरकारला आम्ही कोणतेही निवेदन देणार नाही. यावेळी त्यांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली.

मौलाना तौकीर रझा खान

त्यांनी नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला ( Criticized On PM Narendra Modi ). म्हंटले की हाकिम बनण्याचा छंद आहे, मग ते कसे बनतात ते सांगतो. नरेंद्र मोदी कलमा वाचा, आम्ही तुम्हालाही आमच्या डोक्यावर बसवू. ते म्हणाले की, मी तमाम हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की, जर तुम्हाला मोक्षाचा मार्ग हवा असेल, तर तुम्हाला कोणत्या मार्गाने मोक्ष मिळेल, तो मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. मी उदाहरण देईन, हे जग मधाने भरलेल्या वाटीसारखे आहे. आपण मुंग्या आहोत. ज्या मुंग्या हावरट होऊन अधिकाधिक मिळविण्याचा मोह करतात आणि त्याच मधात बुडून मरतात. त्या जगात हिशोब द्यावा लागतो, त्यामुळे काळजी घ्या.

त्याचबरोबर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक ( Praise to CM Yogi Adityanath ) केले. उत्तर प्रदेशातील अनेक घटनांचा संदर्भ देत ते म्हणाले की, योगी सरकारने योग्य काम करताना अनेक घटनांच्या दोषींवर कठोर कारवाई केली आहे.

अग्निपथ योजनेवरही त्यांनी निशाणा ( Targeted on Agnipath Scheme ) साधला. म्हंटलं की नाव असं ठेवलं आहे, तर आग लागणाराच. देशातील तरुणांचे भविष्य खराब करण्याचा ठेका पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना माझा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. ही योजना त्वरित बंद करावी. नरेंद्र मोदींना टाळी वाजवायची असेल तर हा माझा हात आहे आणि तुमचा हात देखील पुढे करा, दोघे मिळून टाळ्या वाजवू. उत्तर प्रदेश सरकारकडून आम्हाला कोणतीही समस्या नाही.

हेही वाचा -Fashion Designer Girl Raped: जयपूरमध्ये लग्नाचे आमिष देऊन फॅशन डिझायनरवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details