महाराष्ट्र

maharashtra

Shaista Parveen Search Operation: अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनचा शोध सुरु, ५३ दिवसांपासून आहे फरार

By

Published : Apr 18, 2023, 1:59 PM IST

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या मृत्यूनंतरही शाइस्ता परवीन अंत्यसंस्काराला हजर राहिली नाहीत. याआधी मुलगा असदच्या मृत्यूनंतरही ती अंत्यविधीला हजर राहिली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा रंगत आहेत.

mafia atiq ahmed asraf murder case police teams again active to search shaista parveen
अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीनचा शोध सुरु, ५३ दिवसांपासून आहे फरार

प्रयागराज (उत्तरप्रदेश): माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल हत्याकांडानंतर फरार आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके राज्यभर शोध घेत आहेत. मात्र, ५३ दिवस उलटूनही पोलिस आणि एसटीएफची अनेक पथके शाईस्तापर्यंत पोहोचू शकलेली नाहीत. तिचा मुलगा, पती आणि मेहुण्याच्या मृत्यूनंतरही शाईस्ता अंत्यसंस्कारालाही हजर राहिली नाही. या संदर्भात सर्व प्रकारच्या चर्चा आणि अफवांचा बाजार तापला आहे.

शाईस्ता पोलिसांना सापडेना:अतिक अहमदच्या मृत्यूनंतरही त्याची पत्नी शाइस्ता परवीनचा पत्ता नाही. बाहुबलीचा मुलगा असद एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर शाईस्ता नक्कीच मुलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्या दिवशीही शाइस्ता परवीन पुढे आली नाही.यानंतर 15 एप्रिलच्या रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची वैद्यकीय तपासणी सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतीक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर पतीच्या हत्येनंतर शाईस्ता परवीन नक्कीच येणार, अशी चर्चा तीव्र झाली. परंतु, पती आणि मुलाचा अंत्यसंस्कार होईपर्यंत शाईस्ता पुढे न आल्याने याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

अफवांना आले उधाण:अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येला तीन दिवस उलटूनही शाईस्ता समोर आली नाही, मात्र आता तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्याची अफवा वेगाने पसरत आहे. शनिवारी रात्री अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर शाईस्ता न दिसल्याने अफवांना उधाण आले आहे. रविवारपासून शाइस्ता परवीनच्या आत्महत्येच्या अफवा पसरत होत्या. तर दुसरीकडे शाइस्ता परवीनसोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. कारण, मुलगा आणि पतीच्या निधनानंतरही शाइस्ता परवीन अंत्यदर्शनासाठी आलेली नाही. त्यामुळे शाइस्ता परवीन हयात असती तर ती नक्कीच पतीच्या अंत्यसंस्कारासाठी आली असती, अशीही चर्चा लोकांमध्ये आहे. कारण, याआधी उमेश पालच्या हत्येनंतर ती उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पती आणि मुलासाठी बाजू मांडण्यात मग्न होती. वकिलाच्या सतत संपर्कात राहून ती लॉबिंगमध्ये गुंतली होती.

तपासाचा वेग वाढवला:50 हजारांचे बक्षीस असलेल्या शाइस्ता परवीनचा शोध पोलिसांच्या पथकांनी पुन्हा एकदा तीव्र केला आहे. कारण, मुलगा असदच्या अंत्यसंस्काराला किंवा पती आणि मेहुण्याच्या अंत्यसंस्काराला शाईस्ता नक्कीच येईल, अशी अपेक्षाही पोलिसांना होती. जिथून पोलीस तिला अटक करण्याच्या तयारीत होते. तीन दिवसांपासून अतिक अहमदच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत महिला पोलिसही तैनात करण्यात आले होते. मात्र, शाईस्ता पतीच्या अंत्यविधीला हजर न राहिल्याने पोलिसही हतबल झाले. यानंतर शाईस्ताच्या शोधासाठी पोलिसांची पथके पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत.

हेही वाचा: हरियाणात इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details