महाराष्ट्र

maharashtra

Hijab Ban : 'पुढील निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको', सोमवारी होणार सुनावणी, न्यायालयाचे निर्देश

By

Published : Feb 10, 2022, 5:05 PM IST

Updated : Feb 10, 2022, 5:12 PM IST

हिजाब प्रकरणावर ( Karnataka Hijab Controversy ) आज वरिष्ठ खंडपीठाने सुनावणी केली. आता याप्रकरणाची सुनावणी सोमवारी दुपारी होणार आहे. याप्रकरणावर निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको. धार्मिक पोषाख टाळावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हिजाब
Hijab Ban

बंगळुरू - कर्नाटकमध्ये हिजाब परिधान ( Karnataka Hijab Controversy ) करण्यावरून वाद सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटताना दिसून येत आहेत. हिजाब प्रकरणावर आज वरिष्ठ खंडपीठाने सुनावणी केली. दिवसभराची सुनावणी संपली असून आता याप्रकरणाची सुनावणी सोमवारी दुपारी होणार आहे. निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको. धार्मिक पोषाख टाळावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एकल खंडपीठाने हिजाब प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केले होते. आज या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती जेएम खाजी यांच्या खंडपीठासमोर झाली. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी उच्च न्यायालयात हिजाब समर्थक विद्यार्थिनींची बाजू मांडली. तर सरकारची बाजू सरकारची बाजू महाधिवक्ता प्रभुलिंगा यांनी मांडली. हिजाब घालण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गोपनीयता आणि विवेकाच्या अधिकारात येतो, असा युक्तीवाद हेगडे यांनी केला.

उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम विद्यार्थिंनींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याला विरोध केला जात आहे. कर्नाटकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व हायस्कूल आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी बेंगळुरूमधील शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध पुढील दोन आठवडे कायम राहणार आहेत.

काय प्रकरण?

उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थीनी हिजाब घालून आल्यानंतर हिजाबला प्रत्युत्तर म्हणून भगवी शाल परिधान केलेले हिंदू विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये आले होते. भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या हे दोन्ही गट समोरासमोर आले आणि एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे तणाव वाढला होता. या घटनेचवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाने जोर धरला आहे.

हेही वाचा -Hijab Controversy Case : हिजाब वादाची महाराष्ट्रातही ठिणगी; जाणून घ्या, काय आहे वाद ?

Last Updated : Feb 10, 2022, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details