महाराष्ट्र

maharashtra

lakhimpur case : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी

By

Published : Oct 10, 2021, 10:30 AM IST

Updated : Oct 10, 2021, 11:47 AM IST

लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

lakhimpur-kheri-violence-accused-ashish-mishra-sent-to-jail-hearing-will-be-held-tomorrow
lakhimpur case : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी

लखीमपूर खीरी - लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्राला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे साडे दहा तास त्याची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आशिष निर्दोष आहे. पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही, असे आशिष मिश्राचे वकील अवधेश सिंग यांनी सांगितले.

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण

लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराप्रकरणी आरोपी आशिष मिश्रा याला शनिवारी अटक करण्यात आली. आशिष हा लखीमपूरच्या टिकूनिया प्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर 302, 304 ए, 147, 148, 149, 279, 120 बी यासह सर्व गंभीर कलमांमध्ये गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या कार्यालयात, डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आयपीएस सुनील कुमार सिंह यांच्या पथकाने 10 तासांच्या चौकशीनंतर आरोपींच्या अटकेविषयी माध्यमांना सांगितले. एसआयटी टीमला आरोपी त्याच्या निर्दोषतेचा कोणताही ठोस पुरावा देऊ शकला नाही. सकाळी 11.40 ते रात्री 11 या वेळेत चौकशी पथकाने आशिषला अटक केली. पोलीस पथकाने आरोपीला कडक बंदोबस्तात पोलीस लाईन्स गुन्हे शाखा कार्यालयापासून जिल्हा रूग्णालय मेडिकलमध्ये नेले.

वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपी आशिष मिश्राला न्यायदंडाधिकारी / रिमांड दंडाधिकारी दीक्षा भारती यांच्यासमोर हजर करण्यात आले. दुसरा शनिवार असल्याने पोलीस आरोपींना दंडाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेले होते. दंडाधिकाऱ्यांनी आशिषला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कडक बंदोबस्तात आशिषला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

नेमकं काय घडले होते?

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे.

हेही वाचा -पालकमंत्री जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आलीय - आमदार गोपीचंद पडळकर

Last Updated :Oct 10, 2021, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details