महाराष्ट्र

maharashtra

KSRTC buses to become classrooms : केरळमध्ये पडून असलेल्या सरकारी बसमध्ये सुरू होणार शाळांचे वर्ग

By

Published : May 18, 2022, 6:40 PM IST

पायलट प्रोजेक्ट म्हणून, तिरुवनंतपुरममधील मनक्कड सरकारी शाळेत वर्गखोल्या उभारण्यासाठी दोन लो-फ्लोअर एसी बसेस शिक्षण विभागाकडे ( bus as classrooms at Manakkad School ) सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सध्या महामंडळाच्या विविध आगारांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बस पडून ( 100 crore worth of buses  ) आहेत. मानक्कड शाळेतील पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास आणखी बससचे वर्गखोल्यांमध्ये रूपांतर केले जाईल, असे परिवहन मंत्री अँटनी राजू ( Transport Minister Antony Raju ) यांनी सांगितले.

KSRTC buses
केरळ बस

तिरुअनंतपुरम - केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या ( Kerala State Road Transport Cooperation ) मालकीच्या शेकडो बस वापराविना पडून आहेत. त्यामुळे टीका होत असते. अशा स्थितीत केरळ परिवहन महामंडळाने बस या शिक्षण विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या बसचे वर्ग खोल्यांमध्ये ( KSRTC bus for classrooms ) रूपांतरण करण्यात येणार आहे.

पायलट प्रोजेक्ट म्हणून, तिरुवनंतपुरममधील मनक्कड सरकारी शाळेत वर्गखोल्या उभारण्यासाठी दोन लो-फ्लोअर एसी बसेस शिक्षण विभागाकडे ( bus as classrooms at Manakkad School ) सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सध्या महामंडळाच्या विविध आगारांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बस पडून ( 100 crore worth of buses ) आहेत. मानक्कड शाळेतील पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास आणखी बसचे वर्गखोल्यांमध्ये रूपांतर केले जाईल, असे परिवहन मंत्री अँटनी राजू ( Transport Minister Antony Raju ) यांनी सांगितले.

केएसआरटीसीचा उपक्रम म्हणून बसचे प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये निवासस्थानांमध्ये रूपांतर करण्यात आले. हा उपक्रम खूप यशस्वी ठरला. महागड्या हॉटेल्सचा स्वस्त पर्याय म्हणून स्लीपर कोच आणि टॉयलेट असलेल्या बसला पर्यटकांनी चांगली पसंती दर्शविली. एका बर्थसाठी फक्त 100 रुपये आकारले जात होते. ब्लँकेट, बेडशीट आणि उशा स्वतंत्रपणे शुल्क आकारले जातात. तर संपूर्ण बस ही केवळ 1,600 रुपयांमध्ये बुक करता येत होती. आर्थिक संकटात असलेले केरळ परिवहन महामंडळाकडून वाहतूकीशिवाय इतर मार्गांतून उत्पन्न शोधण्याचे प्रयत्न करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details