महाराष्ट्र

maharashtra

Journalist Murder : अररियामध्ये पत्रकाराची हत्या, घरात घुसून हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

By

Published : Aug 18, 2023, 1:15 PM IST

बिहारमधील अररियात विमल यादव नावाच्या पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. विमल यादव एका दैनिकात कार्यरत होते. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्येच्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्रकाराची घरात घुसून हत्या
पत्रकाराची घरात घुसून हत्या

अररिया (बिहार) :बिहारमध्ये गुंडराज पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. अररियामध्ये चार गुंडांनी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडलीय. विमल कुमार यादव, असं या पत्रकाराचं नाव आहे. विमल यादव हे एका दैनिकात कार्यरत होते. ही घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केलाय.

गोळ्या झाडल्या :राणीगंज प्रखंड जिल्ह्यातील पत्रकार विमल यादव हे मागील काही वर्षांपासून प्रखंड वार्ताहर म्हणून एका दैनिकात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांनी पत्रकार विमल यादव यांच्यावर गोळीबार केला. पहाटेच्यावेळी हल्लेखोरांनी यादव यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच हल्लेखोरांनी यादव यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. विमलवर गोळीबार झाल्याची बाब घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांना राणीगंज येथील रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती तेथील पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकासह पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अररिया येथील रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक पुरावे गोळा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आज सकाळी साधराण साडेपाच वाजेच्या सुमारास राणीगंज बाजारमध्ये राहत असलेल्या पत्रकार विमल यादवची चार जणांनी हत्या केली. विमल यादव हे एका दैनिकामध्ये पत्रकार म्हणून काम करत होते. पहाटेच्या वेळी विमल कुमार यादव यांच्या घरी चार मारेकरी आले. त्यांनी विमल यांना आवाज दिला. विमल यादव यांनी घराचा दरवाजा उघडताच मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तेथून फरार झाले. या हल्ल्यात विमल यांचा जागीच मृत्यू झाला. विमल यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळ्या लागल्या. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे . याप्रकरणाचा तपास लवकर पूर्ण केला जाईल आणि मारेकऱ्यांना अटक केली जाईल. - अशोक कुमार सिंह, पोलीस अधीक्षक , अररिया

कुटुंबियांमध्ये भीती : विमल यादव यांची हत्या झाल्यानंतर कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी त्यांना धीर दिला. पोलीस यंत्रणा त्यांच्यासोबत असून प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहील. त्यांनी भीतीमध्ये राहण्याची गरज नाही, अशा शब्दात पोलीस अधीक्षकांनी त्यांना हिंमत दिली. पत्रकाराच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर अररियाचे खासदार प्रदीप कुमार सिंह हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पीडित कुटुंबियांची सांत्वना केली.

हेही वाचा-

  1. Sana Khan Murder Case : सना खान प्रकरणी 'त्या' मृतदेहाची डीएनए चाचणी होणार
  2. Sana Khan Missing case: भाजपा नेत्या सना खान बेपत्ता होण्याचे गूढ कायम, गेला कुठे मृतदेह?

ABOUT THE AUTHOR

...view details