महाराष्ट्र

maharashtra

M. Venkaiah Naidu On Journalism : पत्रकारिता नैतिकतेवर उभी असावी -एम. व्यंकय्या नायडू

By

Published : Apr 28, 2022, 1:21 PM IST

माध्यमांनी समाजाला आरसा दाखवून सकारात्मक बदलासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (M. Venkaiah Naidu On Journalism ) तसेच, पत्रकारिता नैतिकतेच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि लोकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते नेल्लोर येथे आयोजीत कार्यक्रमात होलत होते.

एम. व्यंकय्या नायडू
एम. व्यंकय्या नायडू

नेल्लोर (आंध्र प्रेदेश) - माध्यमांनी समाजासमोर आरसा दाखवला पाहिजे आणि सकारात्मक बदलासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. (Journalism should be based on ethics ) पत्रकारिता नैतिकतेच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि लोकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ते बुधवार (दि. 27 एप्रिल)रोजी त्यांच्या गावी (10 Kw AIR FM)रेडिओ स्टेशनच्या नवीन (100)मीटर टॉवरचे उद्घाटन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात होलत होते.

लोक माध्यमांचे कौतुक तेव्हाच करतील जेव्हा माध्यमे सत्याच्या जवळ आणि सनसनाटीपणापासून दूर राहतील अस निरिक्षनही उपराष्ट्रपतींनी नोंदवले आहे. दरम्यान, "माध्यमांच्या स्वातंत्र्यावर नेहमीच वाद होत आला आहे आणि तो चालूच राहिला पाहिजे. माध्यमांच्या स्वातंत्र्यामुळे समाज आणि लोकशाहीचे रक्षण केले जाऊ शकते. परंतु जर कोणी स्वातंत्र्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असही ते म्हणाले आहेत. दरम्यान, उपराष्ट्रपतींनी रेडिओने लोकप्रियता आणि अनेक कलाकारांना ओळख मिळवून देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना विविध विषयांवर शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असही ते म्हणाले आहेत.

आपल्याला या एफएम स्टेशनचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. कारण आपण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून या प्रकल्पाची पायाभरणी केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली. यावेळी राज्याचे कृषी मंत्री के गोवर्धन रेड्डी, प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेम्पती, ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक एन वेणुधर रेड्डी आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा -Biden Will Meet PM Modi : अमेरिका अध्यक्ष जो बायडेन पुढील महिन्यात पंतप्रधान मोदींची घेणार भेट

ABOUT THE AUTHOR

...view details