महाराष्ट्र

maharashtra

Jammu Kashmir Encounter : सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; शोपियानमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 8:05 AM IST

Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सैन्य दलातील जवानांना यश आलं आहे.

Jammu Kashmir Encounter
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत द रेझिस्टन्स फ्रंट ( टीआरएफ ) या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी मारण्यात सैन्य दलाच्या जवानांना यश आलं आहे. या दहशतवाद्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.

टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्याचा खात्मा :शोपियान जिल्ह्यातील कटोलन परिसरात टीआरएफ या प्रतिबंधित संघटेनेतील दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्य दल आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे भारतीय सैन्य दलातील जवानांनी कटोलन परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्याला सैन्य दलानंही चोख प्रत्युत्तर दिलं. यावोळी दोन्हीकडून सुरू असलेल्या गोळीबारात टीआरएफच्या एका दहशतवाद्याला यमसदनी धाडण्यात सैन्य दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त :भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. या दहशतवाद्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवादी मोठा कट रचत असल्याचा संशय सैन्य दलांना आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

कटोलन परिसरात दहशतवादी लपल्याचा संशय :शोपियानमधील कटोलन परिसरात एका दहशतवाद्याला मारण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र या परिसरात मारलेल्या दहशतवाद्याचे साथिदार लपून बसल्याचा संशय भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना आहे. त्यामुळे या परिसरात कसून तपास करण्यात येत आहे. पोलीस गुप्तचर विभागाच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा कट उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत. कटोलन परिसरात दहशतवादी लपून बसल्याचा संशय असल्यानं सैन्य दलातील जवान सतर्क झाले आहेत.

हेही वाचा :

  1. JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; सैन्य दलाच्या जवानांनी काश्मीर पंडिताच्या हत्येचा काढला वचपा
  2. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं

ABOUT THE AUTHOR

...view details