महाराष्ट्र

maharashtra

INDW vs ENG T20 Series : भारतीय महिला संघाचा सात विकेट्सने पराभव, इंग्लंडने 2-1 ने जिंकली मालिका

By

Published : Sep 16, 2022, 6:16 PM IST

Updated : Sep 16, 2022, 7:41 PM IST

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 विकेट्सवर गमावून 122 धावाच केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 18.2 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची टी-20 मालिका देखील 2-1 ने जिंकली ( England won the T20 series 2-1 ).

INDW vs ENG
भारत

ब्रिस्टल: आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने गुरुवारी तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा सात गडी राखून पराभव ( England won by seven wickets ) केला. अशाप्रकारे इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. त्यांनी पहिला टी-20 सामना नऊ विकेट्सने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने आठ विकेट्सने विजय मिळवून चांगले पुनरागमन केले होते.

पण तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय फलंदाजांना सातत्या राखता आले नाही. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताला आठ गड्यांच्या मोबदल्यात 122 धावाच करता आल्या. इंग्लंडने 18.2 षटकांत 3 बाद 126 धावा करून सहज विजयाची नोंद केली. आता रविवारपासून या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका ( INDW vs ENG ODI Series ) खेळवली जाणार आहे.

दरम्यान नाणेफेक हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली, परंतु लवकरच त्यांची शीर्ष फळी ढासळली. भारताने अवघ्या 35 धावांत आपले आघाडीचे पाच फलंदाज गमावले होते. यामध्ये सलामीवीर शेफाली वर्मा (5), स्मृती मानधना (9) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) (5) यांच्या विकेट्सचा समावेश होता. सुभिन्नी मेघना आणि डी हेमलता यांना खातेही उघडता आले नाही. स्नेह राणा (8) 52 धावांवर सहा गडी बाद झाले.

भारतीय संघाला 100 धावांचा टप्पा गाठता आला तर त्याचे श्रेय यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषला ( Wicketkeeper batsman Richa Ghosh ) जाते. जिने 22 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. रिचा व्यतिरिक्त केवळ दीप्ती शर्मा (24) आणि पूजा वस्त्राकर (नाबाद 19) यांनी दुहेरी आकडा गाठला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने 25 धावांत तीन तर सारा ग्लेनने तीन षटकांत 11 धावांत दोन बळी घेतले.

छोट्या लक्ष्यासमोर सोफिया डंकले ( Sophia Dunkley ) (44 चेंडूत 49) आणि डॅनी व्हाइट (22) यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावा जोडून इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर अॅलिस कॅप्सी (24 चेंडूत नाबाद 38) आणि ब्रायोनी स्मिथ (नाबाद 13) यांनी इंग्लंडला 10 चेंडू राखून लक्ष्य पार करुन दिले. भारताकडून पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा -Sehwag Vs Kallis Charity Match : सेहवाग विरुद्ध कॅलिस 'चॅरिटी' सामन्याने लिजेंड्स लीग क्रिकेटला होणार सुरुवात

Last Updated : Sep 16, 2022, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details