महाराष्ट्र

maharashtra

भारतीय शिष्टमंडळाने घेतली तालिबान अधिकाऱ्यांची भेट

By

Published : Jun 3, 2022, 11:18 AM IST

अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुट्टाकी यांनी भारतीय MEA (Ministry of External Affairs) सहसचिव जे.पी. सिंग यांच्या शिष्टमंडळाची काबूलमध्ये भेट घेतली. या बैठकीत भारत-अफगानमधील राजकीय संबंध, द्विपक्षीय व्यापार आणि मानवतावादी मदत यावर चर्चा कण्यात आली, असे तालिबानचे प्रवक्ते अब्दुल कहर बाल्की यांनी सांगितले.

भारतीय शिष्टमंडळाने घेतली तालिबान अधिकाऱ्यांची भेट
भारतीय शिष्टमंडळाने घेतली तालिबान अधिकाऱ्यांची भेट

नवी दिल्ली - अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुट्टाकी यांनी भारतीय MEA (Ministry of External Affairs) सहसचिव जे.पी. सिंग यांच्या शिष्टमंडळाची काबूलमध्ये भेट घेतली. या बैठकीत भारत-अफगानमधील राजकीय संबंध, द्विपक्षीय व्यापार आणि मानवतावादी मदत यावर चर्चा कण्यात आली, असे तालिबानचे प्रवक्ते अब्दुल कहर बाल्की यांनी सांगितले. अफगाणिसानला मानवतावादी दृष्टिकोणातून मदत करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ अफगानिस्तानच्या दौऱ्यावर आहेत.

"भारत अफगानिस्तान सोबत विविध क्षेत्रात मदत आणि काम करण्याचा विचार करात आहे. भारताने अलीकडेच अफगाणिस्तानच्या निर्यातीसाठी आपली सीमा आणि बंदरे खुली केली आहेत. ज्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत अफगाणिस्तानच्या निर्यातीत वाढ झाली आहे, भारत या क्षेत्रात आणखी सुविधा अफगाणिस्तानला देणार आहे. त्यामुळे अफगानिस्तानची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. दोन्ही देशांनी परस्परसंवाद वाढवण्यास सहमती दर्शविली आहे.

एमईएचे (MEA)प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिल्लीत सांगितले की, "भारताय शिष्टमंडळ तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटेल. मानवतावादी दृष्टिकोणातून मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही शिष्टमंडळ भेट देइल. भारतीय शिष्टमंडळाने काबूलमधील इंदिरा गांधी चिल्ड्रन हॉस्पिटल आणि पॉवर स्टेशनला भेट दिली आहे. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रित केल्याचे बागची म्हणाले." याशिवाय, शिष्टमंडळ अफगानिस्तानात अंमलबजावणी होत असलेल्या विविध प्रकल्पाला भेट देणे अपेक्षित आहे."

दरम्यान भारताने आताप्रर्यंत 20, हजार मेट्रिक टन गहू, 13 टन औषधे, कोविड लसीचे 5 लाख डोस, कपडे आगोदरच पाठवल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. "ही मदत काबूलमधील इंदिरा गांधी चिल्ड्रेन हॉस्पिटल, WHO (World Health Organization) आणि WFP (World Food Programme) सह संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सींना सुपूर्द करण्यात आली आहे. शिवाय, भारत अफगाणिस्तानला अधिक वैद्यकीय मदत आणि अन्नधान्य पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे." "भारताने युनिसेफला पोलिओ लसीचे 60 दशलक्ष डोस आणि दोन टन आवश्यक औषधांचा पुरवठा करून मदत केली आहे. भारताच्या मानवतावादी सहाय्याची अफगानिस्तानच्या नागराकांनी प्रशंसा केली आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा -Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details