महाराष्ट्र

maharashtra

India Corona Update : देशात नवे कोरोना रुग्ण घटले, मात्र मृत्यूसंख्या 1000 पार

By

Published : Feb 9, 2022, 9:52 AM IST

देशातील नवे रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 71 हजार 365 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 1217 जणांचा मृत्यू झाला ( India Corona death ) आहे.

India Corona Update
India Corona Update

दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रसार कमी झाला असून, रुग्णसंख्या 80 हजारांच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 71 हजार 365 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. मृत्यूसंख्या वाढली असून, 1217 जणांचा मृत्यू झाला ( India Corona death ) आहे. तर, 1 लाख 72 हजार 211 रुग्णांनी कोरोनावर मात केली ( Indian Corona Recovery ) आहे.

देशात सध्या 8 लाख 92 हजार 828 कोरोना रुग्णांवरती विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, पॉझिटिव्हीटी रेट 4.54 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 5 हजार 279 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने ( India Corona Total Death ) झाला आहे. तर 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 कोरोना लसीचे डोस देण्यात ( India Total Vaccination ) आले आहे.

हेही वाचा -Pakistan kidnapped fishermen and boats : पाकिस्तानकडून दहा बोटींसह 60 मच्छिमारांचे अपहरण; पोरबंदर आणि ओखा येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details