महाराष्ट्र

maharashtra

India Corona Update: भारतात गेल्या 24 तासात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

By

Published : Feb 13, 2022, 9:37 AM IST

Updated : Feb 13, 2022, 11:52 AM IST

भारतात कोरोना संसर्ग (Corona infection in India) कमी होत आहे. गेल्या 24 तासात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली; देशात सध्या 5 लाख 37 हजार 45 सक्रिय रुग्ण आहेत. तर पाॅझिटिव्हीटी रेट 3.17% आहे

India Corona Update
भारत कोरोना अपडेट

नवी दिल्ली: गेल्या एका दिवसात भारतात कोरोनाचे 44 हजार 877 नवीन रुग्ण नोंदवल्या गेले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर देशात कोरोनाचे ५० हजारांहून कमी नवे रुग्ण समोर आले आहेत. सध्या 5 लाख 37 हजार 45 सक्रिय रुगण आहेत.तर पाॅझिटिव्हीटी रेट 3.17% आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 44 हजार 877 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याच बरोबर देशातील संक्रमितांची संख्या 4 कोटी 25 लाख 86 हजार 544 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे. शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना मुळे 804 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर, संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 07 हजार 981 झाली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात 6 लाख 10 हजार 443 कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत, जे एकूण संसर्गाच्या 1.43 टक्के आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 97.37 टक्के आहे. आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 3.48 टक्के होता आणि साप्ताहिक दर 5.07 टक्के होता.

देशात आतापर्यंत एकूण 4कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. .उल्लेखनीय असे की, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशात बाधितांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली होती.

Last Updated : Feb 13, 2022, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details