महाराष्ट्र

maharashtra

Income Tax Raid : इनकम टॅक्सच्या धाडीत 1200 कोटींचे काळे धन जप्त

By

Published : Dec 24, 2022, 10:04 PM IST

आयकर विभागाने उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये मांस उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. (Income tax raid in Uttar Pradesh). या दरम्यान आयकर विभागाला कंपन्यांमध्ये अनेक घोटाळे आढळन आले तर 1200 कोटी रुपयांचा काळा पैसा देखील सापडला. (caught black money of 1200 crores).

Income Tax Raid
Income Tax Raid

लखनौ : उत्तर प्रदेशातील मांस उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर इनकम टॅक्स विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत (Income tax raid in Uttar Pradesh) 1200 कोटी रुपयांचा काळा पैसा सापडला आहे. (caught black money of 1200 crores). एवढेच नाही तर 1000 कोटींच्या खात्यातून हेराफेरीचे प्रकरणही समोर आले आहे. आयकर विभागाने लखनौ आणि उन्नावमधील मांस उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर छापे टाकले. हे छापे चार दिवस चालू होते. यावेळी रहमान ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. इथे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा सापडला.

रहमान ग्रुपची करचुकवेगिरी : रहमान ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडवरील छाप्यात 60 कोटी रुपयांचे अवैध उत्पन्न पकडण्यात आले. याशिवाय 60 लाख रुपयांची रोकड आणि 60 लाख रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. रहमान ग्रुपच्या लेजर बुकमध्ये करचुकवेगिरीशी संबंधित अनियमितता आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. कंपनीची युरोपीय आणि आफ्रिकन देशांमध्येही 110 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होती, मात्र ती पूर्णपणे उघड झाली नाही.

या कंपन्यांवर देखील छापे : याशिवाय प्राप्तिकर विभागाच्या पथकाने रुस्तम फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, अल सुमामा अॅग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, बरेली रेहबर फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, बरेली आणि मेरी फ्रोझन अॅग्रो फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर छापे टाकले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details