महाराष्ट्र

maharashtra

कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

By

Published : May 20, 2021, 12:35 PM IST

मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीने या 'कोविससेल्फ' किटची निर्मिती केली आहे. यामुळे आता घरबसल्या स्वतःची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या किटच्या विक्रीला परवानगी देण्यात आलेली ही देशातील पहिलीच कंपनी आहे.

home-testing-kit-for-covid-19-get-icmr-nod
कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

नवी दिल्ली :कोरोना चाचणी करण्यासाठी आता आपल्याला रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पुण्यातील एका कंपनीने तयार केलेल्या किटमुळे, आपण घरबसल्या आपली कोरोना चाचणी करू शकणार आहे. विशेष म्हणजे आयसीएमआरनेही या किटच्या वापराला मान्यता दिली आहे. यासोबतच, डीसीजीआयनेही या किटच्या विक्रीला मंजूरी दिली आहे. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात हे किट उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

मायलॅबची निर्मिती..

मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीने या 'कोविससेल्फ' किटची निर्मिती केली आहे. यामुळे आता घरबसल्या स्वतःची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या किटच्या विक्रीला परवानगी देण्यात आलेली ही देशातील पहिलीच कंपनी आहे. यासाठी कंपनीचे होम टेस्टिंग मोबाईल अ‌ॅप 'मायलॅब कोविससेल्फ' (Mylab Covisself) डाऊनलोड करावे लागणार आहे. हे अ‌ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‌ॅपलच्या स्टोअरवरही उपलब्ध आहे. या अ‌ॅपमध्ये किटचा वापर कसे करावे याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे. तसेच, चाचणीचा अहवालही या अ‌ॅपवरुनच प्राप्त होणार आहे.

कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

काही मिनिटांमध्ये होणार निदान..

सध्या कोरोनाच्या निदानासाठी अँटीजेन आणि आरटीपीसीआर अशा चाचण्या करण्यात येत आहेत. यातील अँटीजेन चाचणीचा अहवाल आपल्याला काही मिनिटांमध्ये प्राप्त होतो, तर आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालासाठी किमान २४ तास लागतात. त्यातच आता होम टेस्टिंग किट आल्यामुळे आपल्याला स्वतःच आपली चाचणी करता येणार आहे. तसेच, या चाचणीचा अहवालही काही मिनिटांमध्येच प्राप्त होणार आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची अँटीजेन निगेटिव्ह आली आहे त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी लोक आधी अँटीजेन आणि मग आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या करत होते.

हेही वाचा : आता RT-PCR टेस्टसाठी स्वॅब घेणे होणार अधिक सोपे; 'निरी'च्या वैज्ञानिकांचा शोध

ABOUT THE AUTHOR

...view details