महाराष्ट्र

maharashtra

Omicron in India Updates: यूपी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना विनंती

By

Published : Dec 24, 2021, 7:56 AM IST

देशातील ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरेक्षाबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालायने पंतप्रधान आणि देशाच्या निवडणूक आयुक्तांना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या लाटेपासून जनतेचे संरक्षण करण्याासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.

allahabad high court
अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद - देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागली ( Omicron in India ) आहेत. वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरेक्षाबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालायने पंतप्रधान आणि देशाच्या निवडणूक आयुक्तांना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या लाटेपासून जनतेचे संरक्षण करण्याासाठी उपाययोजना करण्यास सांगितले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला विनंती केली, की राजकीय पक्षांना गर्दी जमवून निवडणूक रॅली काढण्यास मनाई ( Ban Rallies in UP Elections ) करण्यात यावी. तसेच राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सांगावे. प्रशासनाने पक्षांच्या निवडणूक सभा आणि रॅली रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. शक्य असल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचाही विचारही करावा. कारण प्राण आहे तर जग आहे, असे न्यायालयाने म्हटलं.

टोळी कायद्यांतर्गत तुरुंगात असलेल्या संजय यादव या आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी या सूचना केल्या. अलाहाबादच्या ठाणे कॅन्ट परिसरात संजय यादवविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि बंगाल विधानसभेच्या निवडणुकांमुळे लोकांना खूप संसर्ग झाला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष हे रॅली, सभा इत्यादी घेत आहेत. यामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नाहीत, असे न्यायालयाने म्हटलं. आताच कोरोनावर नियंत्रण मिळवले नाही, तर भयानक परिणाम भोगावे लागतील, असे न्यायालयाने नमूद केले.

हेही वाचा -MH Assembly Winter Session 2021 : आदित्य ठाकरे धमकी प्रकरणी एसआयटी स्थापन करणार - गृहमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details