ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : आदित्य ठाकरे धमकी प्रकरणी एसआयटी स्थापन करणार - गृहमंत्री

author img

By

Published : Dec 23, 2021, 7:57 PM IST

आदित्य ठाकरे यांना ( Aditya Thackarey Threat Case ) आलेल्या धमकीचे पडसाद आज विधान भवनात उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu On Aditya Thackarey Threat Case ) यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत सरकारने योग्य दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली.

SIT For Aditya Thackarey Threat Case
SIT For Aditya Thackarey Threat Case

मुंबई - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ( Aditya Thackarey Threat Case ) आलेल्या धमकीचे पडसाद आज विधान भवनात उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu On Aditya Thackarey Threat Case ) यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत सरकारने योग्य दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली.

  • धमक्यांशी कर्नाटक कनेक्शन का तपासावे- मलिक

आदित्य ठाकरे यांना आलेली धमकी कर्नाटकातील बेंगलोर येथून देण्यात आली आहे. यापूर्वी कलबुर्गी गौरी लंकेश पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ही कर्नाटकशी संबंध दिसून आले आहेत. कर्नाटकात भाजपचे सरकार असून त्याचे काही कनेक्शन या प्रकरणाची आहे का, हे तपासून पाहावे, अशी मागणी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Aditya Thackarey Threat Case ) यांनी केली, तर सभागृहात सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ( Sushantsing Rajput Suicide Case ) नाहक काही लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला. समीर वानखेडे यांनी कशा पद्धतीने लोकांना गुंतवून लूट केली, याचा उल्लेखही मलिक यांनी सभागृहात केला.

  • सनातन संस्थेवर केंद्राने बंदी घालावी - भुजबळ

धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रकरणे गंभीर असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात व्यक्त केले.सनातन सारख्या संस्था सातत्याने कारवाया करीत असतात अशा संस्थांवर केंद्र सरकारने बंदी आणावी अशी सूचनाही भुजबळ यांनी यावेळी केली.

  • आमदारांची समिती करा - मुनगंटीवार

मिलिंद नार्वेकर यांना ही यापूर्वी धमकी आली होती एकनाथ शिंदे नवाब मलिक छगन भुजबळ आणि स्वतः आपण या सर्वांना सातत्याने धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. धमकी प्रकरणी कारवाई करण्यासाठी सरकारने आमदार यांची एक समिती नेमावी आणि त्या माध्यमातून पुढील धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

  • सनातनबाबत आधी पुरावे द्या - फडणवीस

आमदारांना येणाऱ्या धमक्यांची प्रकरणे अतिशय गंभीर आहेत. कुठल्याही आमदाराला अथवा मंत्र्याला आलेल्या धमकीची दखल घेऊन अशांना ठेचले पाहिजे. मात्र, सनातन सारख्या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी आधी बंदीचा प्रस्ताव पाठवताना काही पुरावे द्यावे लागतात राज्य सरकार ते पुरावे देऊ शकलेले नाही, हे आधी त्यांनी मान्य करावे, असे फडणवीस यांनी सभागृहात म्हटले.

  • धमकी देणाऱ्याला अटक - गृहमंत्री

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत यांना बेंगलोर येथून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात सादर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भात सरकार गंभीर असून चौकशी करत आहे. तसेच अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा - MH Assembly Winter Session 2021 : शेतकऱ्याला चोर म्हणणाऱ्या सदस्यांनी माफी मागावी - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.