महाराष्ट्र

maharashtra

New Parliament : देवेगौडा, जगन मोहन यांना पहिल्या रांगेत स्थान; नव्या समीकरणांची नांदी?

By

Published : May 28, 2023, 6:58 PM IST

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात विरोधी पक्ष सहभागी झाले नसतील, पण सहभागी झालेल्या पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नक्कीच मोठा राजकीय संदेश दिला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना पुढच्या रांगेत बसवून मोदींनी काहीही न बोलता बरेच काही सांगितले आहे.

leaders in first row in new Parliament
नवीन संसदेत पहिल्या रांगेतील नेते

नवी दिल्ली :आज नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगीमाजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी संसदेच्या पुढच्या रांगेत दिसले. बिजू जनता दलाच्या वतीने सस्मित पात्रा उपस्थित होते. त्यानंतर बहुजन समाज पक्ष, तेलगू देसम पक्ष आणि लोजपचे प्रतिनिधी बसले होते. या सर्व पक्षांनी इतर विरोधी पक्षांपेक्षा वेगळी भूमिका घेत संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

मोदींनी स्वत: केले देवेगौडांचे स्वागत : एचडी देवेगौडा यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वत: आले. त्यांनी त्यांचे हात धरून स्वागत केले. एकूण 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. या पक्षांनी इतर पक्षांनाही संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. मात्र, संसद भवनाच्या कार्यक्रमाला विरोध करणे हे लोकशाहीसाठी योग्य नसल्याचे या पक्षांनी म्हटले आहे.

मोदींना पाठिंबा, मात्र एनडीएचा भाग नाही : तसे पाहिले तर हे तेच पक्ष आहेत, जे वेळोवेळी मोदी सरकारला पाठिंबा देतात. मात्र असे असूनही ते एनडीएचा भाग नाहीत. जेव्हा जेव्हा विरोधक एकजूट होऊ लागतात तेव्हा हे पक्ष एकतच त्यांचा डाव उधळतात, किंवा मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहतात. विशेष म्हणजे सरकारची अनेक फसलेली विधेयके त्यांच्यामुळेच मंजूर झाली आहेत. आता पुन्हा एकदा अनेक विरोधी पक्ष विरोधकांना एकत्र करून मोदी सरकारच्या विरोधात एकत्र निवडणुका लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या पक्षांमुळे त्यांचे मनसुबे यशस्वी होत नाहीत.

मोदींचा राजकीय संदेश : एचडी देवेगौडा यांनी अनेक वेळा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. लोजपच्या चिराग पासवान यांना तर भाजपचे 'हनुमान' म्हटले जाते. जगन मोहन रेड्डी यांची राजकीय स्थिती अशी आहे की ते काँग्रेसला पाठिंबा देऊ शकत नाहीत. कमी - अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती बिजू जनता दलाचीही आहे. आता यातील काही पक्ष भाजपसोबत जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, संसदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने देवेगौडा यांचे स्वागत केले, त्यातून नक्कीच मोठा राजकीय संदेश दिला गेला आहे.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi : संसदेची नवी इमारत 140 कोटी भारतीय नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. Sanjay Raut On Parliament Inauguration : 'हे लोकशाहीसाठी चांगले नाही', संजय राऊतांची 'सामना'तून टीका
  3. New Parliament Building : नवीन संसद भवन उद्घाटन सोहळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details