महाराष्ट्र

maharashtra

अद्दल घडवली! हुंड्यात बुलेट मागणं नवरदेवाला पडलं चांगलंच महागात

By

Published : May 27, 2021, 5:03 PM IST

हुंड्यामुळे अनेक मुलींची लग्न मोडली आहेत. मात्र, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका नवरी मुलीने हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या नवरदेवाच्या हाती ना नवरी लागली ना बुलेट. या विषयाची चर्चा सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशात सुरू आहे.

लखनऊ
लखनऊ

लखनऊ - ‘हुंडा’ हा दोन अक्षरी शब्द वधूपित्याला कर्जबाजारी करणारा आणि वरपक्षाला मालदार करणारा आणि सुखावणारा शब्द. हुंडा हा आज 21 व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे. देशात हुंड्याची पद्धत अशी रूढ झाली आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा असतानाही या कायद्याला कोणी जुमानत नाही. हुंड्यामुळे अनेक मुलींची लग्न मोडली आहेत. मात्र, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका नवरी मुलीने हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या नवरदेवाच्या हाती ना नवरी लागली ना बुलेट. या विषयाची चर्चा सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशात सुरू आहे.

लग्न मोडून हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला शिकविला धडा

हुंड्यात नवरेदवाच्या कुटुंबीयांनी बूलेट मागितली होती. त्याप्रमाणे नवरी मुलीच्या कुटुंबीयांना लॉकडाउन होण्यापूर्वी शोरूममध्ये जाऊन बुलेट बुक केली. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्नाच्या दिवशी शोरूम बंद होते. त्यामुळे नवरीकडच्या कुटुंबीयांना नवरदेवाला बुलेटची पावती सोपवली. मात्र, पावती नाही. तर बुलेटच हवी. बुलेटसोबतच मुलीला सासरी घेऊन जाऊ अशी अट नवरा मुलगा धरुन बसला. नवरी मुलीच्या कुटुंबीयांना त्याला मनवण्याचा प्रयत्न केला.

ही गोष्ट नवरी मुलगी कुलसुमपर्यंत पोहचताच तीच्या संतापाचा भडका उडाला. लोभी माणसाबरोबर मलाच लग्न करायचे नाही, असे सांगत नवऱ्या मुलीनेच लग्नाला नकार दिला आणि नवरदेवाला परतण्यास सांगितले. मात्र, नकार ऐकल्यानंतर नवरदेवाला चांगलाच झटका बसला. बुलटेसाठी आपली आई हट्त करत असल्याने तीच्या सांगण्यावरून सगळे केल्याचे नवरदेवाने सांगितले. नवरी मुलगी कुलसुमने लग्न मोडून हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. अशी अद्दल घडवली आहे की तो आयुष्यभर ती विसरू शकणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details